बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: गेल्‍या चाळीस वर्षापासून ग्राहकांना उत्‍तम सेवा देणा-या वसंतराव अनंतराव ढाळे सराफांच्‍यावतीने खास गुढीपाडव्‍यानिमित्‍त सुवर्णसंधी योजना 2013 या विशेष लकी ड्रा योजनेचा शुभारंभ दिमाखात पार पडला. प्रख्‍यात अभिनेत्री अलका कुबल या कार्यक्रमाच्‍या विशेष आकर्षण ठरल्‍या. पुण्‍या-मुंबईत दिसणा-या दागिन्‍यांच्‍या लेटेस्‍ट व्‍हरायटीज, आपुलकीची सेवा, पारदर्शक व्‍यवहार आणि ग्राहकांचा फायदा करुन देणा-या आकर्षक योजना हे सगळं वसंतराव अनंतराव ढाळे यांच्‍याकडे मिळत असल्‍यामुळे आता सोने खरेदीसाठी शहरात जाण्‍याची गरजच उरली नाही. सुवर्णसंधी ही बार्शी गावातली ही पहिलीच योजना विक्रीचे सगळे विक्रम मोडेल, असा विश्‍वास यावेळी अलकाताईंनी व्‍यक्‍त केला.
    बाजारपेठेत संपन्‍न झालेल्‍या या कार्यक्रमात शाही लखोट्याचे अनावरण अलका कुबल यांनी केले. त्‍यास उपस्थितांनी टाळ्याच्‍या कडकडाटात भरभरुन प्रतिसाद दिला. यावेळी पॉलिटेक्निक कॉलेजच्‍या संचालक वर्षाताई ठोंबरे व सुवर्णकार समाजाचे माजी अध्‍यक्ष अशोक डहाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. फुलांचे तोरण, रांगोळी, सनईचे मंगल स्‍वर अशा प्रसन्‍न वातावरणात गुढीपाडव्‍याच्‍या मुहुर्तावर खरेदी करण्‍यासाठी ढाळे यांच्‍या पेढीवर ग्राहकांचा उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद मिळाला. 3 ग्रॅमच्‍या दागिन्‍यांच्‍या खरेदीवर एक कुपन तर 5 ग्रॅमच्‍या दागिन्‍यांच्‍या खरेदीवर एक कुपन व एक साडी सप्रेम भेट मिळाल्‍याने महिलावर्गाने विशेष समाधान व्‍यक्‍त केले. दि. 1 जुलैपर्यंत चालणा-या या योजनेतील एका भाग्‍यवान ग्राहकास लकी ड्रॉद्वारे हिरो मोटारसायकल व 25 भाग्‍यवान ग्राहकास सॅमसंग मोबाईल भेट दिले जाणार आहेत.  
    या कार्यक्रमात सर्व पाहुण्‍यांचे स्‍वागत पेढीचे संचालक अजय ढाळे व तेजस ढाळे यांनी पुष्‍पगुच्‍छ करुन दिले. तर सौ. संगिता अजय ढाळे यांनी अलक कुबल यांना खास सोलापुरी माहेरची साडी देऊन त्‍यांचा सत्‍कार केला. पाहुण्‍यांचा कु. ऐश्‍वर्या कुलथे हिने करुन दिले. तर आभार कु. सलोनी ढाळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व सर्व आयोजन आनंद क्षेमकल्‍याणी यांनी केले.
 
Top