बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील पेन्शनर्स संघटना व के-मॅक्स फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेह आधार योजनेंतर्गत लिपीड प्रोफाईल, रक्त, लघवी, सी.बी.सी., ई.एस.आर., एक्स-रे, ई.सी.जी इत्यादी तपासण्यासाठी मंगळवारी दि. 16 रोजी उत्तरेश्वर मंदिर येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीरात येताना अल्पोपहार न करता शिबीरात यावे, तसेच तपासणी झाल्यावर त्यांना चहा बिस्किटे तसेच भोजनाच्या वेळी भोजन देण्यात येणार आहे. भोजनानंतर ही त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या शिबीरासाठी नगरपरिषदेचे नगरसेवक नागेश अक्कलकोटे, सुप्रसिध्द डॉक्टर बी.एम. नेने, डॉ. योगेश सोमाणी, डॉ. मंजुषा कुलकर्णी, डॉ. अणवेकर, बाबासाहेब कथले, रंगरेज, उंब्रजकर आदीजण उपस्थित राहणार आहे. शिबीरार्थींची तपासणी करण्यासाठी एस.आर.एल. अँनबॅक्सी लॅब, मुंबई येथील एक पथक उपस्थित राहणार आहे. या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे सदस्य डी.आर. शेटे, मधुकर बोटे यांनी केले आहे.