![]() |
एस.आय. चाऊस |
बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पदावर एस.आर. चाऊस यांनी शनिवारी पदभार स्विकारला. येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र मनसावले यांची तीन वर्षाची सेवा पूर्ण होऊन बराची कालावधी झाल्यावर तसेच ते आजारी असल्याने त्यांना मागील पंधरा दिवसापासून सोलापूर येथे आय.सी.यू. मध्ये उपचार सुरु झाल्यानंतर त्यांच्या जागी कोण येणार? या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.
एस.आय. चाऊस यांनी आजपर्यंत 25 वर्षांची पोलीस खात्यात चोख सेवा बजावली आहे. बीड मधून पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाल्यापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक पदापर्यंत त्यांच्या कार्यकालात दोन वेळा बीड, दोन वेळा लातूर, लातूर येथील बाभळगाव येथे साडेतीन वर्ष, धारुर, पाटोदा, नेकनूर, आंबोरा, उस्मानाबाद, जालना, सोलापूर ग्रामीणला तीन महिने व आज बार्शीत पोलीस निरीक्षक पदावर सेवेत रुजू झाले आहे.