बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : शहरातील बेशिस्‍त वाहतुकीला वळण लावण्‍यासाठी बार्शी नगरपरिषदेकडून ठोस उपाययोजना करण्‍याचा व भविष्‍यातील गरजांसाठी अंमलबजावणी करण्‍याचा ट्रॅफिक सिग्‍नलचा निर्णय सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्‍यात आला.
    सदरच्‍या जिल्‍हा वार्षिक योजनेतील ऊर्जा विकास अभिकरण अंतर्गत शहरात विविध ठिकाणी सौर ऊर्जेवरील ट्रॅफिक सिग्‍नल उभारण्‍याच्‍या कामास 60 लाख 83 हजार रुपये इतक्‍या खर्चाला प्रशासकीय मंजूरी देण्‍यात आली. सदरचे काम निविदा न काढता मेडाच्‍या रेट कॉन्‍ट्रॅक्‍टप्रमाणे मान्‍यताप्राप्‍त फर्मकडून करुन घेण्‍याचा निर्णयही घेण्‍यात आला.
    बार्शी शहर आजपर्यंत वाहतुकीच्‍या कोंडीवरील उपाययोजनेसाठी अनेक वेळेस पर्याय सूचविण्‍यात आले. अनेक रस्‍तयांवर एकेरी वाहतूक योजनेचा आराखडा करण्‍यात आला. परंतु अद्याप पर्यंत कसलेही यश मिळाले नाही. गावातील लहान मोठी वाहने त्‍यांच्‍याकडून वाहतुकीच्‍या नियमाचे नियमित उल्‍लंघन यामुळे सर्वसामान्‍यांची दमछाक होत होती. सदरचा‍ निर्णय झाल्‍याने अनेक रस्‍त्‍यांतील व्‍यापा-यांच्‍या बेपवाईपणे रस्‍त्‍यावर थाटलेल्‍या दुकानदारीला लाल सिग्‍नल मिळणार आहे. शहरात सिग्‍नलच्‍या यंत्रावर वाहतुक सुरु झाल्‍यास ख-या अर्थाने शहराचा विकास होत आहे, असे म्‍हणावे लागले.
 
Top