उस्मानाबाद :- राज्याचे पशुसवंर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
     बुधवार दि.1 मे रोजी सकाळी 7-50 वाजता सर्किट हाऊस येथून पोलीस परेड ग्राऊंड, उस्मानाबादकडे प्रयाण व तेथे  सकाळी 8 वाजता महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम व संचलन समारंभास उपस्थिती. 10-30 वाजता उस्मानाबाद येथून पुण्याकडे प्रयाण. दु.2-30वा. शासकीय विश्रामगृह,पुणे येथे आगमन व राखीव.सायंकाळी 4 वाजता महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ (महानंद) यांच्या वतीने आयोजित मोफत पशुखाद्य वाटप कार्यक्रमास उपस्थिती.(स्थळ : पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ, कात्रज डेअरी, पुणे) तेथून सोयीनुसार अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण,आगमन, राखीव व मुक्काम.
    गुरुवार, दि. 2 मे ते रविवार दि. 5 मे या कालावधीत अणदूर येथील विविध कार्यक्रमांना उपस्थिती व मुक्काम.
    सोमवार दि.6 मे रोजी स.8-30 वा.अणदूरहून तुळजापूरकडे प्रयाण. स.9 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव व तेथून 9-30 वाजता अपसिंगा ता. तुळजापूरकडे प्रयाण. 9-45 वाजता प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या समवेत अपसिंगा येथे  रोजगार हमी योजनेतंर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी. 10-30 वाजता अपसिंगा येथून ठाकरे यांच्या समवेत हाडोंग्री ता. भूमकडे प्रयाण. दु.12 वाजता हाडोंग्री येथे आगमन व ठाकरे यांच्या समवेत चारा छावणीस भेट. दु. 1 वाजता ठाकरे यांच्यासमवेत हाडोंग्रीहून शासकीय विश्रामगृह, उस्मानाबादकडे प्रयाण. दु.2 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. दु.3 वा. ठाकरे यांच्यासमवेत जिल्ह्यातील निवडक काँग्रेस पदाधिका-यांसमवेत बैठक (स्थळ: सार्वजनिक बांधकाम विभागाचे आनंद नगर येथील सांस्कृतिक सभागृह, उस्मानाबाद) त्यानंतर सोयीनुसार  अणदूर ता.तुळजापूरकडे प्रयाण, आगमन, राखीव. सायंकाळी 6-30 वा. अणदूरहून सोलापूरकडे प्रयाण.
 
Top