मुंबई -: महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत कार्यरत असलेल्या परेल येथील कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेमार्फत 'श्रम विज्ञान' विषयात पीएचडी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.   
        मुंबई विद्यापीठामार्फत ही पदवी दिली जाणार असून संस्थेच्या डी. सी. रोड, परेल येथील कार्यालयात 6 एप्रिल पासून अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. अर्जाचे शुल्क 10 रुपये असून अर्ज सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संस्थेच्या कार्यालयात मिळेल किंवा मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुनही अर्जाचा नमुना डाऊनलोड करता येईल. खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी एक हजार रुपये तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये नोंदणी शुल्क आहे. या रकमेचा डिमांड ड्राफ्ट संचालक, कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र 'श्रम विज्ञान' संस्था या नावे विद्यार्थ्यांनी अर्जासोबत जोडावयाचा आहे.
यासाठीची प्रवेश परीक्षा 21 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होणार आहे. प्रवेश परीक्षेसाठीची पात्रता तसेच प्रवेश परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आदींविषयीची माहिती मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.   
      अधिक माहितीसाठी संस्थेच्या 24135332 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा mils@mtnl.net.in या ई-मेलवर संपर्क साधावा, किंवा मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेचे प्रबंधक यांनी केले आहे.
 
Top