उस्मानाबाद :- आदिवासी विकास विभागाच्यावतीने 2013-14 वर्षात अनुसूचित जमातीच्या इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती  प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर यांनी दिली आहे.       
      या योजनेसाठी विधवा, घटस्फोटीत, निराधार, परित्यक्ता व दारिद्रयरेषेखालील कुटूंबातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच एक लाख वार्षिक उत्पन्न  मर्यादा व जातीचे प्रमाणपत्र असलेल्या अनुसूचित जमातीच्या इच्छुक पालकांनी या योजनेच्या लाभासाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर, उत्तर तहसील सोलापूर कार्यालय इमारत, सिव्हील हॉस्पीटल समोर, सोलापूर( दुरध्वनी क्र 0217-2311600) येथे संपर्क साधावा.           
 
Top