उस्मानाबाद :- जिल्ह्याचे पालकमंत्री ा. मधुकरराव चव्हाण हे शुक्रवार पासून उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर असून त्यांच्या कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
       शुक्रवार, दि. 19 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता सोलापूरहून अणदूर ता. तुळजापूर येथे आगमन व राखीव. स. 10 वा. अणदूर येथून उस्मानाबादकडे प्रयाण. स. 11 वा. शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे आगमन. स. 11-15 वा. उस्मानाबाद शहरास पाणीपुरवठा करणा-या योजनेची अधिका-यांसमवेत पाहणी. सायं. 4 वा. मौ. देवळाली ता. उस्मानाबाद येथील पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. सायं.5 वा.मौ.मेडसिंगा, ता. उस्मानाबाद येथील पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. सायं. 6 वा. मौ.रुईभर, ता. उस्मानाबाद येथील पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. सायं.7 वा. श्रीमती लताबाई रामचंद्र तळेगावकर यांच्या पासष्टीनिमित्त तुलादान समारंभास उपस्थिती. स्थळ- लोहिया मंगल कार्यालय, तुळजापूर व त्यानंतर सोयीनुसार अणदूरकडे प्रयाण. आगमन व मुक्काम.
       शनिवार, दि. 20 रोजी स.8-45 वा. अणदूरहून उस्मानाबादकडे प्रयाण. स.9-45 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. स.10-15 वा. उस्मानाबाद तालुका फळबाग अनुदान धनादेश वितरण समारंभास उपस्थिती. स्थळ- वाघोली ता.उस्मानाबाद, दु. 12 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण व स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती.  त्यानंतर  सोईनुसार अणदूरकडे प्रयाण आगमन व मुक्काम.
     रविवार,दि.21 एप्रिल रोजी स.9-45 वा.अणदूरहून मुर्टा ता.तुळजापूरकडे प्रयाण व तेथे स. 10 वा. तिरंगा बहुउदेदशीय सामाजिक संस्था, संचलित चारा छावणीस भेट. त्यानंतर  सोईनुसार अणदूरकडे प्रयाण आगमन व राखीव. सायं.6-30 वा.अणदूरहून सोलापूरकडे  प्रयाण.
 
Top