उस्मानाबाद :- राज्यातील ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या नवीन माध्यमिक शाळेसाठी विनाअनुदान तत्वावर परवानगी देण्यासंदर्भातील बृहत आराखडा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार 144 ठिकाणी विनाअनुदान तत्वावर माध्यामिक शाळा खाजगी व्यवस्थापनामार्फत चालविण्यास परवानगी देण्यात येणार आहे. इच्छुक असलेल्या पात्र संस्थांकडून प्रथमत हेतुपत्र देण्यासाठी विहित प्रपत्रात ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रत्येक ठिकाणाच्या अर्जासाठी ना परतावा तपासणी शुल्क रुपये 10 हजार (रुपये दहा हजार फक्त) राहिल.
 दर अर्ज शासनाच्या तसेच www.newschoolsanctions.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रत उपलब्ध आहे. अर्ज ऑनलाईन भरावेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख्र 15 एप्रिल 2013 आहे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची मुळ प्रत (हार्डकॉपी) आवश्यक कागदपत्रे व चलनाची मुळ प्रत जोडून दि. 20 एप्रिल, 2013 पर्यंत ज्या जिल्हयातील गावासाठी अर्ज भरलेला आहे, त्या जिल्हयाच्या शिक्षणाधिकारी ( माध्यमिक) यांच्याकडे समक्ष सादर करुन त्यांची पोहोच घ्यावी. पोष्टाद्वारे/कुरीअरने पाठविलेले व विहित मुदतीनंतर समक्ष सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज भरतांना काही तांत्रिक अडचण आल्यास 022-42187078/85 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
 
Top