Friday, 23 August 2013

27 ऑगस्ट पर्यंत राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

उस्मानाबाद :- युवकांच्या विकासासाठी राष्ट्रीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 15 ते 35 वयोगटातील युवक-युवतीं व स्वयंसेवी  संस्थांना दरवर्षी 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद जन्मदिनी केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय युवा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी इच्छुक युवक-युवतींनी आपले विहीत नमुन्यात अर्ज 27 ऑगस्टपर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, उस्मानाबाद संजय कुलकर्णी यांनी केले आहे. अधिक माहिती व अर्जाचा विहीत नमुना www.yas.nic.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संबंधितांनी याची नेांद घ्यावी, असे कळवितण्यात आले आहे.

Labels: