अन्नछत्र मंडळातर्फे काँग्रेस तालुकाध्यक्ष म्हेत्रे यांचा सत्कार
अक्कलकोट -: अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर म्हेत्रे यांचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धर्मादाय संस्थानात सत्कार करण्यात आला. अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांच्या हस्ते शंकर म्हेत्रे यांचा शाल, कृपावस्त्र, स्वामींची प्रतिमा, मूर्ती, मानाचा फेटा, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. तसेच मातोश्री लक्ष्मी शुगरचे संचालक शिवराज सिध्दाराम म्हेत्रे यांचा सत्कार अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अमोल भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अन्नछत्र मंडळाचे सचिव शाम मोरे, उपाध्यक्ष अभय खोबरे, नगरसेवक उत्तम गायकवाड माजी नगराध्यक्ष महेश इंगळे आदीजण उपस्थित होते.
Labels: प्रदेश

<< Home