Friday, 29 November 2013

गटविकास अधिकारी आचारसंहिता प्रमुख

उस्मानाबाद - राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्याप्रमाणे जानेवारी ते मार्च 2014 मध्ये मुदती संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र  ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोट निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम  घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. 
          संबंधित तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून निवडणूक आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी आचार संहिता प्रमुखांची  नेमणूका  करण्यात आल्या असून  संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, पंचायत समिती  यांची आचार संहिता प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

Labels: