नळदुर्ग विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
नळदुर्ग :- येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा भारतीय संविधानाची प्रास्ताविका व शाल, बुके देवून सत्कार करुन गौरव करण्यात आला.
विविध पक्ष, संस्था, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येवून गठीत केलेल्या सत्कार संयोजन समीतीच्यावतीने नळदुर्ग येथील शासकीय विश्रामगृह येथे पंचायत समिती उपसभापती प्रकाश चव्हाण यांची शासनाच्या तांडा वस्ती सुधार योजनेच्या जिल्हा समीतीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तर लहूजी शक्ती सेनेचे सोमनाथ कांबळे यांची संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कोअर प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच फुले शाहू आंबेडकर चळवळीमधील कार्यकर्ते सुभाष मच्छिंद्र बनसोडे हे निवृत्त झाल्याबद्दल वरील सर्वांचे अनुक्रमे संविधानाची प्रास्ताविका व शाल, बूके देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे जिल्हाउपाध्यक्ष दुर्वास बनसोडे तर प्रमुख पाहूणे म्हणून शहराध्यक्ष बाबासाहेब बनसोडे व लहुजी शक्तीसेनेचे शिवाजी गायकवाड आदी उपस्थित होते. याप्रसंगी आर.एस. गायकवाड, यूवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अरूण लोखंडे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक भैरवनाथ कानडे यांनी तर सुत्रसंचालन एस. के. गायकवाड यांनी केले.

Labels: नळदुर्ग

<< Home