Thursday, 30 January 2014

प्रजासत्ताकनिमित्त ४५ दात्यांचे रक्तदान

बार्शी : येथील शेर-ए-हिंद टिपू सुलतान सोशल फाऊंडेशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर व गुणवंताचा सत्कार करण्यात आला. या शिबीरात ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी सुवर्णपदक विजेता पियुष सितापराव यांचा सत्कार करुन गौरविण्यात आले. यावेळी सलिम चौधरी, निसार सय्यद, इलियास शेख, वसीम शेख, असिफ शेख, शकील सय्यद, मोहसिन तांबोळी, अय्याज शेख, शहानवाज शेख आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रगीताने शिबीराची सांगता करण्यात आली.

Labels: