उस्‍मानाबाद - गणेश मोरे यांच्‍या नेतृत्‍वाखाली नेताजी कोळगे, अंकुश शिंदे, वसिम पठाण, प्रमोद कुलकर्णी, सोनु धावारे, उमेश कुलकर्णी, आशिष डीगीकर, किरण सोनवणे, भरत धुमाळ, अनंत जाधव यासह मोठया संख्‍येनी तरूणांनी भारतीय जनता पार्टी मध्‍ये प्रवेश केला. भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष नितीन काळे यांच्‍या हस्‍ते प्रमुख कार्यकर्त्‍यांचे पक्षामध्‍ये स्‍वागत करण्‍यात आले. याप्रसंगी रामभाऊ पडवळ, तालुकाध्‍यक्ष भिमराव साळुंके, भिमाशंकर हासुरे, प्रविण पाठक, विनायक कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
  यावेळी बोलताना नितीन काळे म्‍हणाले की, भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड झाल्‍यापासून देशातील तरूणांमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण पसरले आहे. त्‍यामुळे सक्षम बनविण्‍यासाठी तरूणांनी तन,मन,धनाने भाजपमध्‍ये प्रवेश करावा. असेही त्‍यांनी सांगितले.   
 
Top