पिंपरी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जास्तीत जास्त अधिक कुटुंबांना बँक खाते देण्याचा मोदींचा उद्देश आहे. प्रत्येक खातेदाराला डेबिट कार्ड आणि एक लाख रुपयांची सिकनेस इन्शुरन्स पॉलिसी देण्यात येणार आहे. आज जन-धन' या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ झाला.  निगडी यमुनानगर येथील प्रबोधनकार केशवराव ठाकरे क्रिडा संकुल येथे जन-धन' योजनेचे बँक खाते पुस्तकाचे वाटप भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार व( IDBI) बँकेच्या मुख्य महाव्यवस्थापक मेधा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार,( IDBI) बँकेच्या मुख्य महाव्यवस्थापक मेधा जोशी , सहायक महाव्यवस्थापक संजय थोरात ,सोनाली नागले , शाखा प्रमुख देबोरा चौधरी ,अमनदीप कौर,दिपॉय रॉय आदि या वेळी उपस्थित होते.
पवार यांनी जन-धन' या योजनेचा सर्वसामान्य नागरिकाला याचा फायदा झाला पाहिजे कुटुंबाच्या सुरक्षतेसाठी याचा फायदा होणार आहे आपण आपल्या जवळच्या लोकांनाही या बद्धल माहिती दिली पाहिजे  सार्वजनिक बँकेच्या विविध शाखांमार्फत ग्रामीण आणि शहरी भागात ६0 हजारांहून अधिक विशेष शिबीर आयोजित केले जाणार आहे. योजनेच्या शुभारंभालाच जवळपास निगडी येथील ( IDBI ) बँकेत १०हजार खाते उघडले गेले असल्याचे पवार यांनी सांगितले.
 सहा महिन्यांपर्यंत खाते व्यवस्थित चालल्यानंतर आधारकार्डशी संबंधित खात्यांवर पाच हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाईल पवार यांनी त्या संदर्भात नागरिकांना सविस्तर माहिती दिली.
 
Top