उस्मानाबाद -जिल्ह्याच्या राजकारणात सदैव हाय होल्टेज असलेल्या तेरणा शेतकरी साखर कारखान्यावर राष्ट्रवादीच्या वतीने प्रचंड मार्चा काढुन विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकण्यात आले. या मोर्चाला मार्गदर्शन करताना माजी राज्यमंत्री राणा पाटील यांनी शिवसेना व काँग्रेसवर चांगलाच प्रहार केला. तेरणा कारखान्यातील मागच्या सात वर्षात विद्यमाना सत्ताधा-यांनी भ्रष्टाचार करुन स्वत: घरे भरली तसेच तेरणातल्या भ्रष्टाचारास पालकंत्री पाटीलशी घातल असल्याचे सांगुन मागच्या सात वर्षाच्या काळात तेरणा कारखान्यावर आलेले ‘ विघ्न’ घालवण्यासाठी शक्ती द्या असे अवाहनही यावेळी राणा पाटील यांनी सभासद शेतक-यांना केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यासंदर्भात आज तेरणा शेतकरी सहकारी साखर करखान्यावर भव्य मोर्चा काढण्यात आला. तेरणा कारखान्याच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी व कारखान्यातील गैरकारभाराची निपक्षपणे चौकशी होण्यासाठी कारखान्यावर तातडीने प्रशासक नेमावा, तेरणा कारखान्यावरील २००७ ते २०१४ या कालावधीत जे भंगार विकले आहे, त्या भंगार विक्रीचा तपसील द्यावा या व विविधि मागण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने आज र्मार्चा काढण्यात आला होता.
या मार्चाला मार्गदर्शन करताना राणा पाटील यांनी शिवसेना व काँग्रेसवर चांगलीच टिका केली. ते म्हणाले की सन १९७८ मध्ये डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या ताब्यामध्ये तेरणा कारखाना आल्यानंतर त्यांनी १२०० वरुन १० हजार प्रतिमेट्रीक टनगाळप क्षमता कारखान्याची केली. कारखाना कसा चालवावा हे डॉ. पाटलांनी संपुर्ण महाराष्ट्राला दाखवुन दिले.
२००६-०७ च्या गळीत हंगामात कारखान्याने ८ लाख ३६ हजार मे.टन एवढे विक्रमी गाळप केले होते. ९ लाख पोते साखर व डिस्टलरीचे ५० ते ६० लाख असे एकुण ४०० कोटीच्या जवळपास मालमत्ता शिल्लक होती. मात्र त्यांनतर २००७ साली विरोधकांच्या ताब्यात कारखाना गेल्यानंतर कारखान्यात अनेक गैरव्हवहार झाले आहेत. आ. ओमराजे व त्यांच्या मामांनी कारखान्याची अतिशय दुरावस्था केली आहे. आमदार कारखान्याचे कर्ज फेडल्याचा कांगावा करीत असले तरी त्यांनी त्यामुळे २००७ ते २०१४ या कालावधीतल्या ९०० कोटी रुपयाचा हिशोब द्यावा असे अवाहन केले. तसेच तेरणा कारखान्याच्या माध्यमातुन ‘ मामा-भाच्यांनी’ जागजीयेथे ४ एकरात सुसज्ज बंगले थाटल्याचा आरोपही राणा पाटलांनी केला.
तर यावेळी राणा पाटालांनी काँग्रेस व पालकमंत्र्यांवरही निशाना साधला. तेरणा कारखान्यातील भ्रष्ट्राचारास पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे पाठशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच जिल्हा बँकेला राज्य शासनाकडुन मदत मिळवण्यासाठी पालकमंंत्री मधुकरराव चव्हाण यांनी जिल्हा बँकेचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत न आणल्यामुळे जिल्हा बँकेची दुरावस्था झाल्याचे त्यांनी म्हटले. तसेच आगामी काळात माझ्या मागे उभे राहील्यास तेरणावरचे ‘विघ्न’ दुर करण्याचे अश्वासन त्यांनी यावेळी सभासदांना दिले.
मोर्चानंतर झालेला सभेचे प्रस्तावीक गफार काझी यांनी केले तसेच या मार्चामध्ये कामगार संघटनेचे राजभाऊ देशमुख, कोंडप्पा कोरे, प्रविण यादव, तानाजी जमाले, तेरणाचे माजी चेअरमन सुरेश देशमुख, राजभाऊ पाटील आदंीनी आपले विचार व्यक्त केले.
या मोर्चामध्ये गजानन माने, लाला शितोळे, बु-हाण काझी, सुनिल काकडे, नंदु राजेनिंबाळकर, गजानन नलावडे, उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील शेतकरी, सभासद व कारखान्याचे कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोच्र्याच्या पाश्वभुमिवर ढोकी येथे प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कळंबचे उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे, पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे, ढोकीचे सहाय्यक पोनि दिगंबर शिंदे, यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तेरणेच्या माजी कर्मचा-यांच्या कुटुंबाला २ लाखांची नाडे यांच्याकडून मदत
पुर्वी तेरणा सहकारी कारखान्याचा कर्मचारी असलेले मौलाभाई शेख हे मुरुड येथील डि. डी. एन गुळ फॅक्टरीमध्ये कामाला होते. त्यांचा -हद्यविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. त्यामुळे कारखान्याचे मालक दिलीप नाडे यांनी आज मोर्चानंतर राणा पाटील यांच्या हस्ते मयत कामगारांच्या कुटुंबाला दोन लाख रुपयाची मदत केली.
मोर्चा काढला, पण
मागण्यांचे निवेदन नाही
तेरणा कारखान्याच्या विविध प्रशानसंमधी आज राष्ट्रवादी काँग्रेस व कामगार कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात मोठ्या संख्येने नागरीक सहभागी झाले होते. कारखान्यातील गैरव्यवहाराची चौकशी करावी व इतर मागण्यासाठी काढण्यात आलेल्या हा मोर्चा तेरणा कारखान्याच्या गेटवर जावून धडकला. मात्र यावेळी मागण्यांचे निवेदन स्विकारण्यासाठी कोणीच न आल्याने मागण्याचे निवदेनच देण्यात आले नाही. तेरणा कारखाना किंवा प्रशासनाच्या वतीने कोणीच निवेदन स्विकारले नाही.
निवडणुकीच्या तोंडावरच ‘तेरणा’ चा पुळका का?
तेरणा साखर कारखाना म्हणले उस्मानाबाद- कळंब येथील शेतक-यांच्या दृष्टीन अत्यंत महत्वपुर्ण विषय आहे. तेरणा कारखान्याची वाट लावण्यात आजपर्यंतच्या सर्वच सत्ताधा-यांचा हात आहे. मात्र निवडणुका जवळ आल्याकी सोयीस्कर रित्या ‘ तेरणा कारखान्याविषयी’ पुळका असल्याचा आव सर्वच राजकीय नेते आणतात. आ. ओमराजे निंबाळकर यांनाही निवडणुका आल्याकी तेरणा कारखान्याविषयी पुळका येतो. तर विधानसभा निवडणुक जवळ आल्यानेच राष्ट्रवादीलाही तेरणाचा पुळका आल्याची चर्चा आज परिसरातील लोकांमध्ये होती.
पालकमंत्र्यांवर राणा पाटालांची टीका
तेरणा कारखान्यातल्या भ्रष्टाचाराला पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे पाठीशी घालत आहेत. जिल्हा बँकेला मदत मिळवी म्हणुन आम्ही उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी हा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चेला आल्यानंतर नक्की मदत करु असे अश्वासन दिले होते. मात्र पालकमंत्र्यांनी जिल्हा बँकेचा विषय मंत्रीमंडळात चर्चेला न आणल्याने जिल्हा बँकेला मदत मिळु शकली नाही असे त्यांनी सांगीतले. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला संपवण्यासाठी शिवसेना-काँग्रेस-भाजपा अशी युती तयार करुन जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली आहे. मात्र मतदारांना आता त्यांची चुक लक्षात आली असून येणा-या काळात मतदार राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा राहील असे मत राणा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
चो-या कोण रोखणार?
तेरणा कारखान्या मागच्या काही वर्षापासून बंद आहे. त्यात कामगार संपावर गेल्यामुळे कारखान्याला वाली उरला नाही. कारखाना व परिसरात अंधाराचे साम्राज्य असल्याने आजपर्यंत कारखान्यातुन कोट्यावधी रुपयाच्या साहीत्याची चोरी झाली आहे. त्यासंदर्भात पोलीसात तक्रारही दाखल नाहीत. त्यामुळे तेरणा कारखान्यात होत असलेल्या चो-या कोण रोखणार याबाबत मोर्चात सहभागी सभासदांमध्ये चर्चा सुरु होती
 
Top