उस्मानाबाद - लहानापासून थोरापर्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जाणा-या गणेशोत्सवाच्या आगमनाने अबालवृद्धांसह गणेश मंडळ व गणेश भक्तांमध्ये उत्साह भरभरून आला आहे. आज गणरायाचे जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या भक्तीमय वातावरणात आगमन होणार असल्याने गणरायाच्या आरासासाठी लागणा-या साहित्यांनी बाजार पेठा फुलून गेल्या आहेत. भक्तांमध्येही खरेदीसाठी आज उत्साह दिसुन येत होता.
गेल्या पाच दिवसापासून जिल्ह्यात सर्वदुर पाऊस झाल्याने दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या शेतक-यासह सर्वसामान्य गणेश मंडळ व भक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक गणेश मंडळे गणपती बसविणार की नाही याची शंका होती. मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने गणेश भक्तांमध्ये आनंदाचे व उत्साही वातावरण दिसुन येत आहे.
प्लॅस्टिक ऑफ पॅरिसच्या माध्यमातुन गणपती बनविलेले गणपती हे पर्यावरण पुरक आहेत. ते साधारणत: महिन्याभरात विरघळतात. यामुळे निसर्गास धोका कमी प्रमाणात होता. परंतू शाडूपासुन बनविलेल्या मुत्र्या या विरघळण्यास फार उशिर लागतो.
गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी गणरायाच्या मुर्तींची किंमत २५ ते ३० रूपयांनी महाग झाल्या आहेत. दुष्काळी परिस्थिती व वाढती महागाई पाहता या किंमती कमी किंवा स्थिर राहणे महत्वाचे असतानाही त्या महाग झाल्या आहेत.
यंदा ५० रूपयांपासून ते ४० हजार रूपयांपर्यंतच्या  बाजार पेठेमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये ५० ते हजारो रूपयापर्यंतच्या मुत्र्यांना गणेश भक्त आपल्या घरामध्ये बसविण्यासाठी घेऊन जात आहेत. गणरायाच्या आगमनासाठी शहरातील सर्वच गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. लहान मुलांमध्येही एक वेगळाच उत्साह निर्माण झाला असल्याचे दिसुन येत आहे.
 
Top