नळदुर्ग  नळदुर्ग  शहराला तालुक्‍याचा दर्जा द्यावा, या मागणीसह विविध मागण्‍यांचे निवेदन तुळजापूर तालुका रिपाइंच्‍यावतीने तहसीलदार यांना  देण्‍यात आले आहे.
     रिपाइंच्‍यावतीने तहसीलदारांना दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले की, तुळजापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा, ऐतिहासिक नळदुर्ग शहराला तात्‍काळ तालुक्‍याचा दर्जा द्यावा उस्‍मानाबाद जिल्‍हा दुष्‍काळग्रस्‍त जिल्‍हा म्‍हणून जाहिर करावा. तुळजापूर तालुयातील भूमीहीन अतिक्रमणधारकांच्‍या नावे गायरान जमीन करावी, महागाई निर्देशांकानूसार मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांच्‍या शिष्‍यवृत्‍तीत वाढ करावी आदी मागण्‍यांचा सामावेश या निवेदनात करण्‍यात आला आहे.   या निवेदनावर रिपाइंचे तालुकाध्‍यक्ष एस.के. गायकवाड, जिल्‍हा उपाध्‍यक्ष दुर्वास बनसोडे, नळदुर्ग शहराध्‍यक्ष बाबासाहेब बनसोडे, रिपाइं युवा आघाडीचे तालुकाध्‍यक्ष अरूण लोखंडे, रिपाइं जिल्‍हा सरचिटणीस तानाजी कदम, तुळजापूर शहराध्‍यक्ष अरूण कदम यांची स्‍वाक्षरी आहे.
 
Top