नळदुर्ग - काटगाव ता. तुळजापूर  येथे हरणाई सामाजिक  संस्‍थेतंर्गत शेतीविषयक समस्‍या सर्वेक्षण व प्रबोधनपर शिबीर नुकतेच घेण्‍यात आले. या शिबीर दरम्‍यान विविध उप‍क्रम राबविण्‍यात आले.
   या शिबीराच्‍या उदघाटन प्रारंभी इटली देशातील इंजिनिअर सेंझा फ्रेंतरी (आयएसएफ) मिलानो येथील फ्रॅन्सिस्‍को व इम्‍योन्‍युवला या परदेशी पाहुण्‍यांचा गावक-यांतर्फे यथोचित सत्‍कार करण्‍यात आला. याप्रंगी ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. पुणे येथील प्रोकलस्‍टर बिझनेस असो सिएशनचे प्रमुख पदाधिकारीही उप‍स्थित होते. दिवसभरात विविध स्‍थळाना  भेटी देण्‍यात आल्‍या. त्‍यामध्‍ये प्राथमिक शाळा, माध्‍यमिक शाळा, आरोग्‍य केंद्र व गावातील प्राथर्नीय व प्रेक्षणीय स्‍थळांना भेटी देण्‍यात आल्‍याञ
    गावातील बागायतदार, जिरायतदार, अल्‍पभूमीधारक भूमिहीन शेतक-यांच्‍या घरामध्‍ये व शेतावर जावून  त्‍यांच्‍या मुलाखती घेवून प्रत्‍यक्ष शेतीची पाहणी करण्‍यात आली. सामाजिक प्रबोधनाकरिता शेतकरी स्‍वाभिमान जागृती अभियान राबविण्‍यासाठी गावातील मुख्‍य  चौकामध्‍ये सांस्‍कृतिक कार्यक्रम घेण्‍यात आला. यावेळी शेतकरी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यशाळामध्‍ये विविध क्षेत्रातील समस्‍या व उपाय यावर प्रश्‍नोत्‍तर घेण्‍यात आले. यामध्‍ये गावक-यांच्‍या मतांना प्राधान्‍य देवून समस्‍या निराकरणाची उपायोजना सांगण्‍यात आली. यावेळी मार्गदर्शन म्‍हणून संतोष खवळे, संदिप तुवर, तुषार साळवे, उध्‍दव कठारे, व प्रफुल्‍ल खवळे हे प्रमुख उपस्थित होते. ग्रामस्‍थांना भेडसावणा-या विद्युत समस्‍या, आरोग्‍य विषयक आडचणी, पाणीटंचाई या बाबी प्रकर्षाने जाणवल्‍या.    
 
 
Top