उस्‍मानाबाद :- काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेतेमंडळीनी आपल्या संस्था व नातेवाईकांसाठी शेतक-याच्या जिव्हाळ्याच्या असणा-या मध्यवर्ती बँकेतून मोठ्या प्रमाणात कर्जे उचलून त्या कर्जाचा भरणा केला नसल्यामुळे मध्यवर्ती बँकचे आर्थिक डबघाईस आली आहे. तेव्हा या धनदांडग्याकडून कर्ज वसुली करुन त्या कर्जातून सामान्य गोरगरीबाना मध्यवर्ती बँकेने हातभार लावला पाहिजे असे मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी केली.
       उस्‍मानाबाद तालुक्यातील पाडोळी विभागाअंतर्गत असणा-या २४ गावातील शिवसेनेच्या शाखांची पुर्नबांधणी करुन त्या शाखांच्या नामफलकाचे अनावरण आज रविवार रोजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना पाटील यांनी ही मागणी केली.
     शेतक-याची आर्थिक नाडी समजल्या जाणा-या जिल्हा मध्यवर्ती बँकेस काँग्रेस आघाडीच्या नेत्यानीच आर्थिक डबघाईस आणले आहे. तेव्हा या लोकांकडून बँकेच्या कर्जाची सक्तीने वसुली करुन त्या रक्कमेचा विनीयोग जिल्ह्यातील गोर, गरीब जनतेच्या विकासासाठी करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.  काँग्रेस व राष्ट्रवादीच्या संचालव् मंडळाने बेकायदेशीर रित्या मध्यवर्ती बँकेचे कर्ज वाटप केले असून या प्रकरणी या संचालक मंडळावर शासनाने कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी केली.
    शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांच्या हस्ते आज तालुक्यातील मेडसिंगा, बरमगांव, विठ्ठलवाडी, धुता, कनगरा, टाकळी, पाडोळी, मेंढा, घुगी, लासोना, समुद्रवाणी, सांगवी, कामेगाव, वाघोली, काजळा, तेर, मुळेवाडी, वरुडा, शिंगोली, जहागिरदारवाडी तांडा, गड देवधरी, उपळा, तुगाव, रुई ढोकी, बोरखेडा, शेकापूर येथील शांखाची पुर्नबांधणी करुन शाखेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, तालुकाप्रमुख दिलीप जावळे, माजी तालुकाप्रमुख रामेश्वर शेटे, बाळकृष्ण घोडके पाटील, सुनिल जाधव, प्रशांत साळुंके, कमलाकर दाणे, गोविंद कोळगे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.




 
Top