नळदुर्ग - पालकमंत्री मधुकरराव चव्‍हाण यांनी नळदुर्ग शहरात मोठया प्रमाणात विकासकामे केली असून सन 2009 ते 2014 या पाच वर्षात नळदुर्ग शहरासह परिसाराच्‍या  विकासासाठी सुमारे शंभर कोटी पेक्षा अधिक निधी,तर एकटया नळदुर्ग शहारासाठी  जवळपास 28 कोटी रूपयेचा निधी मिळवून दिले आहे.
 पालकमंत्री चव्‍हाण यांनी नळदुर्ग शहराच्‍या विकासाबरोबरच रामतीर्थ व मैलारपूर येथील शहराच्‍या विकासाबरोबरच खंडोबा मंदिराचा मोठया प्रमाणात विकास केला आहे. नळदुर्ग परिसरातील सर्वात उल्‍लेखनिय कामांपैकी महत्‍वाचे काम म्‍हणजे नळदुर्गजवळील रामतीर्थ येथे तब्‍बल 60 कोटी रपये खर्चून बांधण्‍यात येत असलेला उच्‍च पातळीवरचा बंधार हे होय. या बंधार उभारणीचे काम अंतिम टप्प्‍यात आले असून या बंधा-यामुळे नळदुर्ग परिसरातील हजारो एकर शेती सिंचनाखाली येणार आहे. तसेच या बंधा-यामुळे भविष्‍यात कधीच नळदुर्ग शहराला पाणीटंचाईचा प्रश्‍न भोडसावणार नाही. कारण या बंधा-यात मोठया प्रमाणात पाणी साठवून ठेवण्‍याची क्षमता आहे. पुढील अनेक पिढ्यांच्‍या कल्‍याणासाठी ना. चव्‍हाण यांचे हे काम उल्‍लेखनिय आहे.
   राष्‍ट्रीय महामार्गाशेजारी उभारण्‍यात येत असलेल्‍या 50 खाटांचे ग्रामीण रूग्‍णालय हे कामही ना. चव्‍हाण यांचे महत्‍वाचे काम असून या रूग्‍णालयामुळे शहर व परिसरातील नागरिकांच्‍या आरेग्‍याचा प्रश्‍न मिटणार आहे. गेल्‍या पाच वर्षात शासन दरबारी प्रयत्‍न करून नळदुर्ग शहर व परिसराच्‍या विकासासाठी 27 कोटी 52 लाख 99 हजार रूपयांचा निधी त्‍यांनी खेचून आणला आहे. 
नळदुर्ग
कामाचे नाव                        रक्‍कम
विघयो अंतर्गत औजारे वाटप         - 43,455
राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान 2008-09 पपई        - 1,17,000
राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान 2010-11 पपई        - 1,17,000
राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान 2011-12 केळी        - 83,204
कुटुंब अर्थसाह्य योजना व्‍यक्‍तीक लाभार्थी वाटप        - 3,90,000
गळित धान्‍य विकास कार्यक्रम 2011-12            - 8,75,678
रोहयो फळबाग 2011-12 नळदुर्ग मंडळ             - 7,17,030
मुख्‍य कामे गतिमान 2011-12 मंडळ            - 1,33,600
महात्‍मा फुले जलसंधारण अभियान 2011-12        - 1,40,594
गटांचे बळकटीकरण 2012-13 मंडळ            - 40,000
शेंद्रीय शेती 2012-13 मंडळ                - 37,710
गळित धान्‍य विकास कार्यक्रम 2012-13            - 4,19,833
रोहयो फळबाग 2012-13 मंडळ                 - 2,35,581
तृनधान्‍य विकास कार्यक्रम 2013-14 मंडळ        - 32,750
रोहयो फळबाग 2013-14 मंडळ                - 3,79,702
रिचार्ज शॉफ्ट 2013-14 मंडळ                - 1,28,90,250
नैसर्गिक आपत्‍ती मृत जनावरे  अनुदान            - 20,000
नविन कृषी पंप व डी.पी. मंजुरी                - 47,57,187
दलित वस्‍ती सामाजिक सभागृह                - 15,00,000
मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह                 - 3,25,00,000
50 खाटांचे ग्रामीण रुग्‍णालय                - 21,83,00,000
एकूण –: सत्‍तावीस कोटी बाव्‍वन लक्ष नव्‍यान्‍नव हजार नऊशे चोवीस – 27,52,99,924

 
Top