उस्‍मानाबाद -  'माझा महाराष्ट्र , भगवा महाराष्ट्र' या अभियानांतर्गत शिवसेनेने  उस्‍मानाबाद    जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा झंझावात निर्माण झाला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संपुर्ण राज्यात माझा महाराष्ट्र- भगवा महाराष्ट्र या अभियानांतर्गत शिवसेना शाखांचे उद्घाटन, शाखांची पुर्नबांधनी, नामफलकाचे अनावरण याच बरोबर घर तिथे शिवसैनिक हे अभियान राबविण्याचे आदेश देताच जिल्‍हाप्रमुख
शिवसेना सदस्य नोंदणी बरोबरच गेला महिनाभर उस्‍मानाबाद  - कळंब विधानसभा मतदार संघ व तुळजापूर विधानसभा मतदारसंघ अशा दोन मतदारसंघात नवीन २०२ गावी शिवसेना शाखेची स्थापना करण्यात आली व शिवसेना पदाधिका-याच्या नावासह या प्रत्येक ठिकाणी शाखेच्या कामस्वरुपी लोखंडी नामफलकाचे अनावरण करण्यात आले. महत्वाचे म्हणजे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी स्वतःच हे अभियान गेल्या महिन्याभरात दोन मतदार संघातील या २०२ शिवसेना शाखेच्या उद्घाटनाबरोबरच त्यांनी स्वतः या गावास भेट देवून तेथील शिवसेना शाखेची पुर्नबांधनी केली. महिनाभर  सुरु असलेल्या  अभियानामुळे या दोन विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिका-यांना संजिवनी तर मिळालीच पण या दोन मतदारसंघात भगवा झंजावात ख-या अर्थाने निर्माण झाला.
    शाखेच्या पुर्नबांधनी बरोबरच अनेक गावातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक तरुण कार्यकर्त्‍यांनी  शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. शिवसेनेच्या या भगव्या झंजावातामुळे या दोन मतदारसंघातील विरोधीपक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
दरम्यान याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यानी सांगितले की, शिवसैनिकाबरोबरच इतर नागरिक सुध्दा शिवसेनेकडे आता वेगळ्या अपेक्षेने पाहत असून याचा परिनाम येत्या विधानसभा निवडणूकीत दिसल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास व्यक्त करुन अद्यापही जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी, उमरगा व लोहारा या पाच तालुक्यातील प्रत्येक गावास भेट देवून तेथील शाखांची पुर्नबांधनी व ज्या ठिकाणी शाखा नाहीत, त्या ठिकाणी नविन शाखा स्थापन करण्यात येतील असेही त्‍यानी सांगितले.
सुधीर पाटील यांनी जिल्ह्यात या अभियानास प्रारंभ केला. गेल्या एक महिन्यात जिल्हाप्रमुख  पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व संबंधित तालुकाप्रमुखांनी उस्‍मानाबाद तालुक्यात ६५ हजार ७००, कळंब तालुक्यात ३८ हजार ८००, तुळजापूर तालुक्यात ३५ हजार १००, उमरगा तालुक्यात २५ हजार, लोहारा तालुक्यात १३ हजार, भूम तालुका ३० हजार ३००, परंडा तालुका २७ हजार तर वाशी तालुक्यात १६ हजार असे एकूण  २ लाख ५० हजार ९०० एवढ्या शिवसैनिकांची सदस्य नोंदणी करण्‍यात आली.
 
Top