बार्शी  - बार्शीतील पारीजातक हौसिंग सोसायटीमध्ये (22 बंगले) येथे खास आकर्षण म्हणजे येथील सार्वजनिक गणपती हा महिलांनी स्थापना केलेला आहे.
        सध्याच्याकाळात सर्व ठिकाणी गणेशोत्सव हे थाटामाटात व आनंदाने साजरे होत आहेत पण सर्व मंडळांमध्ये पुरुषांचे प्राधान्य पाहायला मिळते पण पारिजातक सोसायटीचा हे मंडळ सहा वर्षापुर्वी महिलांनी आघाडी घेउन स्थापन केले. धकाधकीच्या काळात सामाजिक ऐक्य व बांधिलकी साधण्यासाठी महिलांनी आघाडी घेत मंडळ स्थापन केले.या मंडळाची गणेशाची स्थापना हि दरवर्षी सोसायटितील वेगवेगळ्या ठिकाणी/घरामध्ये केली जाते. दरम्यान रविवारी (7 सप्टे.) सायंकाळी अथर्वशीर्षाचा 501 आवर्तनाचा महाअभिषेक महिलांकडुन करण्यात आला. तसेच दररोज संध्याकाळी महाआरती करण्यात येत होती. आरती मध्ये महिला, बाल व सर्व पुरुष उपस्थित होते.
महाआरती दरम्यान बाल गणेशभक्तांसाठी खाउ वाटप केले जात होते.
अनंतचतुर्थीच्या दिवशी लहान गणेशभक्तांसाठी खेळ घेण्यात आले होते.
यावेळी या गणेशाची स्थापना सौ. प्रेमा खजानदार यांच्या घरात करण्यात आली होती. या वेळी उपस्थितांमध्ये वर्षा साखरे, रुजुता हातोळकर, अंजली पंडित, स्वरांजली देशमुख, शितल कुलकर्णी, उज्वला ठोंबरे, आवारे, गुजरे, कांबळे, मुंढे होते. विषेश आकर्षण अनंत चतुर्दशी दिवशी गणपतीसाठी घेतलेल्या नारळामध्ये कोंब मध्ये गणपतीची
हुबेहूब प्रतिमा आली आहे. पाहण्यासाठी भक्तांची आवर्जुन जात आहेत.
 
Top