पांगरी (गणेश गोडसे)  पांगरी ता.बार्शी परिसरात बुधवारी रात्री आठ वाजता वादळी वार्‍याने थैमान घातल्यामुळे परिसरातील पांढरी, उककडगाव गावासाह पांगरीच्या उत्तर भागातील वस्त्यावरील शेकडो लोकांच्या घरावरील पत्रे उडून गेले.
      शेतकर्‍यांनी काढून ठेवलेल्या सोयाबीन उडून ,विखुरले गेल्यामुळे व  ऊस पडल्यामुळे व शेकडो फळाची व इतर झाडे उन्मळून पडल्यामुळे  मोठे  नुकसान झाले.वीज वितरण कंपनीच्या वीज वाहक तारा,पोल तुटून पडले असून त्यामुळे विदूत प्रवाह खंडित झाला आहे.गावातील रामफल,किंच आंबा आदि अनेक जुने वृक्ष तुटून पडले.पांढरी येथीलच तांबे वस्तीतील पन्नास घरावरील पत्रे उडून गेले.वादळाची गती एवढी होती की वादळामुळे उककडगाव येथून मतदान यंत्रे  घेऊन पांढरीकडे येत असलेली एस टी  बस समुद्रातील जहाजाप्रमाणे हेलकावे खत होती कोणत्याही क्षणी बस पलटी मारेल अशी स्थिती निर्माण झाली होती.चालकाने पुढील काही दिसत नसल्यामुळे  प्रसंगावधान  राखून बस उभी करून वेळ मारून नेली.वादळ शांत झाल्यानंतर बस पांगरीच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली.
    पांढरी ह्या डोंगरी भागात असलेल्या गावातील दत्ता घावटे,भानूदास घावटे,धर्मराज घावटे,बापू आप्पा घावटे,आबा घावटे,शाम शिकेतोड,आदींचे वाडाळच्या तडाख्यात मोठे नुकसान झाले आहे.मुळातच पांगरी भागात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे दुष्काळ सदृश्य  स्थिति आहे.अनेकांच्या विहिरीतील साठे संपत आलेले आहेत.तशातच अल्पश्या पावसावर कसेबसे जगवलेले नगदी सोयबीनचे पिक वादळामुळे वाया गेले आहे.
चौकट: आगोदरच पांगरी भागातील शेतकर्‍यांच्या मागे दृष्ट चकरचा फेरा लागलेला असताना कसेबसे आलेले सोयाबींनचे पीकही निसर्गाने आपल्या कवेत घेऊन नस्ठ केले आहे.त्यामुळे पांगरी भागातील शेतकर्‍यावर रडण्याची वेळ आली आहे.
 
Top