बार्शी (मल्‍लीकार्जून धारूरकर) प्रत्येक संकटाच्या वेळी नेहमीच मी धावून आलो आहे. नुसते कोरडे आश्रू पुसले नाहीत. दुष्काळ निधीतून तालुका वगळला असता बोनस रुपी 28 कोटींचा दुष्काळ निधी खेचून आणला. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप सोपल यांनी भातंबरे, मळेगांव, येथील प्रचार सभेत व्यक्त केले.
    यावेळी सभेचे अध्यक्ष किसनराव यादव, प्रशांत खुने, जयंत बुरगुटे, तुकाराम खुने, विक्रम सावळे, अरुण उघडे, बाळासाहेब खुने, नरसू माळी, आदी उपस्थीत होते. सोपल म्हणाले, जिल्ह्यासाठी 600 कोटींचा दुष्काळ गारपीट निधीपैकी बार्शी तालुक्याला 100 कोटींचा निधी मिळाला आहे. 70 टक्के महाराष्ट्रातील ग्रामीण जनता ही शेतीवर अवलंबून आहे. महाराष्ट्राच्या मातीतील माणूस, मातीत राबलेला माणूस म्हणून पवार साहेबांचे नाव येते. कृषीमंत्री असताना हमी भावात 200 टक्क्याने वाढ केली. आत्ताच्या कृषी मंत्र्याने फक्त दीड टक्क्याने वाढ केली. सद्याच्या कृषीमंत्र्याचे नाव ही सर्वसामान्य जनतेला माहीत नाही. कमळ नेहमी मोठया शहरात फुलले आहे. फक्त जाहीरातीवर मत मिळवले आहेत. विकासाच्या नुसत्या गप्पा मारायच्या हा एक कलमी कार्यक्रम राबविला जातो. कोण नरेंद्र, कोण देवेंद्र आपला फक्त शरदचंद्र हा नारा सोपल यांनी भातंबरे (ता. बार्शी) येथील प्रचार सभेत दिला.
    मळेगांव (ता. बार्शी) येथील प्रचार सभेत सोपल बोलत होते, यावेळी सभेचे अध्यक्ष उत्रेश्वर वाघ, भगवान बुद्रूक, प्रशांत गडसिंग, नवनाथ गव्हाणे, सिद्धेश्वर उंबरे, ननवरे सर, हेमंत गडसिंग, माळी ताई. सुभाष शेळके, मकरंद निंबाळकर आदी उपस्थित होते. एकीकडे माझे काम आहे. मी मदतीसाठी सतत धावत आलो आहे. त्याबद्दल गावकर्‍यांनी माझा सत्कार केला आहे. विरोधकांनी केलेले काम पुराव्यानिशी दाखवावे. 11 कि.मी. ची पाईप केली आहे. पाणीपुजन केलेले आहे. हे सर्व डोळयादेखत पुरावे आहेत. मोठया योजना आणन्यासाठी मोर्चे – संघर्ष करावा लागतो परंतु विनासंघर्ष बार्शी उपसा सिंचनचे पाणी बार्शी तालुक्याला मिळालेले आहे. यापुढील काळातही जास्तीत जास्त कामे करणार अशी ग्वाही सोपल यांनी प्रचार सभेत दिली.
    यावेळी गाडे सर म्हणाले, समाजाची जाण, संयमी नेतृत्व – वकृत्व, उदार दातृत्व असलेल्या माणसाला आपण निवडून दिले पाहीजे. अनिल काटमोरे म्हणाले दुसर्‍याच्या आनंदात स्वत:चा आनंद शोधणारे असे सोपल साहेब हे आनंदयात्री आहेत. हिंगणे – ढाळेपिंपळगांव तलावात उपसासिंचनचे पाणी सोडले जाणार आहे. विक्रम सावळे म्हणाले, सोपल साहेबांना उजनी पुत्र ही पदवी बहाल करावी कारण आपल्या दारासमोर उपसा सिंचन पाण्याच्या रुपाने वैभवशाली भविष्य आले आहे. मकरंद निंबाळकर म्हणाले, जिल्हा परिषदेचा एक सदस्य असताना सुद्धा वैराग भागाचा बहुमान व्हावा म्हणून सभापती पद साहेबांनी बहाल केले. 
चौकट :-     राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश :- शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिगंबर बराटे, धिरज वाघ, हसन बागवान, गणेश नलावडे, शशीकांत श्रीखंडे, हनुमंत माळी, दादा निंबाळकर, बबलू अपणे, शहाजी श्रीखंडे, आदींचा सोपल यांनी सत्कार केला. 
 
Top