उस्मानाबाद - अत्याचारग्रस्त मुलींना त्यांच्या कुटुंबियांनी आणि समाजानेही अवहेलना होऊ न देता मानसिक आधार देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उस्मानाबाद सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र तावडे यांनी केले. 
              येथील जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेच्यावतीने      किशोरवयीन मुलींचा सर्वागिण विकास विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्या. तावडे  बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, अतिरिक्त जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक रुपाली सातपुते, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य कमलादेवी आवटे , युनिसेफच्या श्रीमती भारती, आरोग्य अधिकारी सीमा कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास ) टी.के. नवले, पूजा कदम आदींची उपस्थिती होती
            न्या. तावडे म्हणाले की, अत्याचारास बळी पडलेल्या भेदरलेल्या पिडीत महिला व किशोरवयीन मुलींना वकिलामार्फत कायदयाची ‍माहिती दयावी, योग्यवेळी मार्गदर्शन, समुपदेशन वेळेत मिळणे आवश्यक असते.  अत्याचारग्रस्त मुलींच्या समस्या जाणून घेवून त्या  सोडवाव्यात. मुलींचे गट तयार करुन त्यांचे संघटन करावे, त्यांना स्वयंसंरक्षणासाठी ज्युडो कराटे या खेळाचे  प्रशिक्षण दयावे. फसवणूक झालेल्या मुलींच्या पुनर्वसनासाठी समाजाने चांगली  वागणूक दयावी.  सध्याच्या बदलत्या  सामाजिक परिस्थीतीत मुलींमध्ये  शारिरीक  व मानसिक बदल घडत असतात. या वयात पालकांनी पाल्याचे मित्र बनून त्यांच्या भावना समजावून घेतल्यास किशोरवयीन मुलींच्या समस्या सुटण्यास मदत होईल,असेही ते म्हणाले.
         अतिरीक्त जिल्हाधिकारी जे. टी. पाटील म्हणाले की, देशाची भावी पिढी सुदृढ  निरोगी रहावी, म्हणून किशोरमुलींना समाजाने बालवयापासून चांगले संस्कार करणे आवश्यक असते. मुलींना आरोग्य विभागाने संतुलीत आहाविषयी माहिती दयावी. अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात येते. अनेक आजार बळावतात. तेव्हा  महिला व मुलींनी स्वच्छता मोहिमेत पुढाकार घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
            उस्मानाबाद जिल्ह्यात किशोरवयीन मुलींचा सर्वांगीण विकासअंतर्गत कार्यशाळा उपक्रम  घेतल्याबदल त्यांनी जिल्हा परिषदेला धन्यवाद दिले.
             कु. रावत म्हणाल्या की, मुलगी  शिकली तर कुटुंबाचा विकास होतो. मुलींच्या सर्वागिण विकासासाठी शिक्षण, आरोग्य विभागाने जिल्ह्याच्या विकासासाठी अग्रेसर रहावे, ‍मुलींचे मानसिक , सामाजिक , लैगींक शोषण थांबणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना कायदयाची माहिती असणे आवश्यक आहे. मुलींची आरोग्य विभागामार्फत आरोग्याची शारिरीक तपासणी करुन त्यांना योग्य आहाराची माहिती दयावी. असा मौलीक  सुचना संबधित यंत्रणेला सुमन रावत यांनी दिल्या.
             जिल्हा  परिषदेचे बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  श्री. नवले यांनी आपल्या प्रास्विताकिशोरवयीन मुलींच्या सवांगीणविकास ऊर्जा ‍नावीण्यपूर्ण उपक्रमाची ‍माहि  ‍दिली.
           महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान युनिसेफच्या श्रीमती भारती यांनी किशोरवयीन अत्याचार,पिडीत मुलींना  तातडीने  न्याय मिळवून देवून  त्यांचे प्रश्‍न समजावून घ्यावेत व  मुलींत आत्मविश्‍वास निर्माण करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.      
           या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी केले. श्रीमती अंधारे यांनी उपस्थीतांना गाव स्वच्छता ‍निर्मल भारत अभियान, विधानसभा मतदान जनजागृतीबाबत शपथ दिली. डायटच्या प्राचार्य  श्रीमती आवटे यांनी किशोरवयीन मुलींसाठी शिक्षणातून व्यक्तीमत्व विकासाबाबत मार्गदर्शन केले.              
 
Top