बार्शी -  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धा दि.१३ पासून बार्शीत सुरु होत आहेत. राज्यातील १९ केंद्रांतून या स्पर्धांचे सादरीकरण करण्यात येत आहे. राज्यभरातून २८५ नाटय संस्था यामध्ये सहभागी होत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय कृष्णाजी पाटील यांनी दिली.
उद्योन्‍मुख कलाकारांना हक्‍काचे व्‍यासपीठ व सुप्‍त गुणांना वाव, नाटय कलेचा प्रचार - प्रसार सर्व स्‍तरातून होण्‍यासाठी राज्‍य नाटय स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात येते.बार्शी केंद्रातून प्राथमिक फेरीत सादर होणारे नाटयप्रयोग पुढील प्रमाणे आहेत. दि. 13 दास्‍ता (आराधना विश्‍वस्‍त मंडळ,सोलापूर) दि. 14 एक झुंज वा-याशी (बनशंकरी बहुउद्देशीय संस्‍था, सोलापूर), दि. 15 महापात्रा (भिमज्‍योत महिला सुधारणा मंडळ, सोलापूर), दि.16 गोष्‍ट जन्‍मांतरीची (कुर्डवाडी युवक बिरादरी, कुर्डवाडी), दि. 17 बळी राजा तु का उपाशी (लोकप्रबोधन विविध कलागुणदर्शन कलामंच, उस्‍मानाबाद) दि. 18 स्विंग(पंचमदेव,सोलापूर), दि. 19 चौथा स्‍तंभ (समाराधना, सोलापूर), दि. 20 रातराणी (श्रृति - मंदिर, सोलापूर), दि. 21 खंडहर (सुस्‍नेह सांस्‍कृतिक मंडळ, सोलापूर), दि. 22 लोक गुणाची चिंता लग्‍नाची (स्‍वप्निल सपना लोककला विकास मंडळ, मानेगाव), दि. 23 इस्‍कॅलॅवो (विकास वाचनालय, सोलापूर), दि. 24 सम्राट अशोक (झांकार सांस्‍कृतिक मंच, सोलापूर), या स्‍पर्धेतील नाटयप्रयोग बार्शीतील यशवंतराव चव्‍हाण सांस्‍कृतिक भवन येथे सायं. 7 ते 9 या वेळेत सादर होणार आहेत. सर्व नाटय रसिकांनी या नाटयांचा अस्‍वाद घ्‍यावा असे अवाहन आनंदयात्री प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष नागेश अक्‍कलकोटे,स्‍पर्धा समनव्‍यक रामचंद्र इकारे, सहसमन्‍वयक प्रताप दराडे यांनी केले आहे.

 
Top