बार्शी (मल्लिकार्जून धारूरकर) सिताराम महाराज मंदिर आणि आधार प्रतिष्ठाण बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने अनुरागकृष्ण शास्त्री (कन्हैय्याजी) यांच्या उपस्थितीत भागवत कथा,हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१३ ते २० नोव्हेंबर दरम्यान बार्शीतील सोलापूर रोड येथील मंदिर परिसरात होत असून मागील चाळीस वर्षांपासून अशा प्रकारच्या सप्ताहाचे आयोजन संस्थेकडून होत असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय कदम यांनी दिली.
     या सप्ताहात दररोज दुपारी २ ते ६ कालावधीत भागवत कथा तर रात्री ८ ते १० या दरम्यान किर्तनकार हरिभक्तपरायण प्रमोद काळे, पंडित क्षीरसागर, ऍड.जयवंत बोधले, संजय पाचपोर, केशव उखळीकर, पांडूरंग लोमटे, बाबासाहेब इंगळे, महादेव चाकरवाडीकर यांची सुश्राव्य किर्तने आयोजीत केली आहेत. दि.१२ रोजी सायं.६ पासून भगवंत मंदिर ते कार्यक्रम स्थळापर्यंत शोभायात्रा. दि.१९ रोजी सप्ताह समाप्तीनिमित्त शहरात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
    भागवत कथा सप्ताहात दि.१३ रोजी गणेश पूजन, पद्मपुराणातील भागवत महात्म्य, दि.१४ रोजी मंगलाचरण, भिष्म पांडवांचे चरित्र, परिक्षीत जन्म, शुकदेव प्रकटीकरण, दि.१५ रोजी विराट दर्शन, विदुर मैत्रय संवाद, कपिला गीता व धु्रव चरित्र, दि.१६ रोजीजडभरत चरित्र, अजामिल उपाख्यान, नृसिंह अवतार, दि.१७ रोजी गजेंद्रमोक्ष, समुद्रमंथन, वामन अवतार, श्रीराम अवतार, श्रीकृष्णजन्म, दि.१८ रोजी श्रीकृष्णाच्या लिला, गोवर्धन पूजा, छप्पन भोग, दि.१९ रोजी रासलिला, मथुरेतील श्रीकृष्ण, गोपी उध्दव संवाद, रुक्मिणी विवाह, दि.२० रोजी सुदामा चरित्र, शुकदेव निरोप, व्यास पूजन आणि भागवत कथेची समाप्ती होत आहे.
    या कार्यक्रमाकरिता दोन एकर परिसरात भव्य मंडप उभारणीचे काम सुरु आहे. बाहेरगावहून आलेल्या वारकरी बांधवांसाठी निवासाची सोय करण्यात आली आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.
 
Top