उस्मानाबाद -  इतर मागासवर्गीयांसाठी  असलेल्या विविध योजनांचा संबंधितांनी लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाने केले आहे.
1. 20 टक्के बीज भांडवल योजना - महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लोकांसाठी 20 टक्के बीज भांडवल योजना राबविली जाते. ज्या लोकांना स्वत:चा व्यवसाय सुरु करावयाचा असेल अथवा सुरु असलेल्या व्यवसायात वाढ करावयाची असेल त्यांना महामंडळामार्फत 6 टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा केला जातो. या योजनेत 75 टक्के सहभाग स्थानिक राष्ट्रीयकृत बँकेचा, 20 टक्के महामंडळाचा व 5 टक्के लाभार्थी सहभाग असेल. 18 ते 50 या वयोगटातील ज्यांचे सर्व मार्गांनी कौटुंबीक उत्त्पन्न 1 लाख पेक्षा कमी आहे. असे ओ.बी.सी. प्रवर्गातील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी महामंडळाकडे निधी उपलब्ध आहे.
2.  रु. 25 हजार थेट कर्ज योजना – महामंडळामार्फत नवीन थेट कर्ज योजना सुरु करण्यात आली असून त्याची कर्ज मर्यांदा रु. 25 हजार आहे. याचा व्याजदर दरसाल दर शेकडा 2 टक्के आहे. तर परतफेड 3 वर्षात करावयाची आहे. किरकोळ व्यवसाय करु इच्छीणाऱ्यांसाठी हे कर्ज सहज उपलब्ध होईल.
3.  थकीत कर्जासाठी व्याज दरात 2 टक्के सुट – महामंडळाच्या उस्मानाबाद कार्यालयामार्फ‍त ज्या लाभार्थ्यांना कर्ज वितरण झाले आहे त्यांनी एकरकमी कर्ज खाते बंद केल्यात त्यांना थकीत व्याज दरात 2 टक्के सुट देण्यात येईल. ही योजना 31-12-14 पर्यंत आहे. लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहिती साठी संपर्क क्रमांक (02472) 223863 असा आहे.
वरील सर्व योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, उस्मानाबाद यांनी केले आहे.  
 
Top