बार्शी - शहरातील मध्यवस्तीत असलेल्या व्यापारी सहकारी बँक मर्यादित सोलापूर शाखा बार्शी या बँकेचे मुख्य दरवाजाचे शटर उचकटले तर आतील जाळीच्या दरवाज्याचे कुलूप तोडून बँक फाडून लाखोचे दागीने व रोकड लंपास करण्याचा प्रयत्न असफल झाला आहे. सदरच्या प्रकारामुळे बार्शीतील व्यापारी व नागरिकांत खळबळ उडाली आहे. सोमवारी मध्यरात्री सदरची घटना घडली असून सकाळी हा प्रकार उजेडात आला. बँकेचे शटर उचकटल्याचे दिसून आल्याने रस्त्यावरुन जाणार्या येणार्या नागरिकांनी बँकेच्या संबंधितांना कळविले. बँकेचे कर्मचारी सोलापूरहून शाखा उघडण्याच्या वेळेत दुपारी साडेदहा ते अकराच्या दम्यान आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. बार्शी पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी हजर झाले. यावेळी त्यांना बँकेचे आतील जाळीच्या दरवाज्याचे कुलूप तोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसल्याचे दिसून आले. बँकेच्या अधिकारी व कर्मचार्यांनी आतील सर्व साहित्य व मौल्यवान वस्तू जागेवर आहेत की नाही याची खात्री केली. यावेळी सर्व काही जागेवर असून कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगीतले. बँकेच्या वतीने लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांची मांडणी ही केवळ बँकेच्या आतील बाजूल असल्याने बाहेरील मुख्य दरवाज्याजवळ कोण येऊन शटर उचकटले व त्यांची संख्या किती होती याची माहिती बँकेकडून सांगता आली नाही. सदरच्या प्रकारामुळे बँकेने बाहेरुन कॅमेरे न बसविल्यामुळे त्यांनी योग्य ती काळजी घेतली नसल्याचे दिसून येते. यावेळी बोलतांना बँकेच्या अधिकार्यांनी आम्हाला असे होईल असे