बार्शी - रास्त भाव धान्य दुकानातून शिधापत्रिकेवर देण्यात येणारे धान्य मागील वर्षभरात मिळाले नसल्याने बार्शी तहसिलसमोर दोघांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. सचिन शाम सोनवणे, रा.भिमनगर व बाळू विश्वनाथ कांबळे रा.सिध्दार्थनगर असे उपोषणास बसलेल्या नागरिकांची नावे आहेत.
    धान्य दुकानदारांनी धान्य देण्याबाबत तहसिलचे पत्राची मागणी केली असे सोनवणे यांची तक्रार आहे तर कांबळे यांनी माहिती अधिकारात माहिती मागण्याचाही प्रयत्न केला असून यामध्ये अपिल करण्यात आले असूनही माहितीचे उत्तर तसेच धान्य मिळाले नसल्याचे म्हटले आहे.
    त्यांच्या उपोषणास धाराशिव मतदारसंघाचे खासदार रविंद्र गायकवाड तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी भेटी दिल्या आहेत.
 
Top