उस्‍मानाबाद -    दुष्‍काळी परस्थितीमुळे शेतकरी मोठया आडचणीत सापडले असून प्रसंगी शेतकरी आत्‍महात्‍या करित असल्‍याचे सर्वश्रुत आहे. शेतीवर अवलंबून असलेल्‍या शेतमजुरावरही मोठे संकट निर्माण झाले आहे.शासनाने शेतक-यासह शेतमजुरांना दिलासा देण्‍यासाठी आवश्‍यक त्‍या उपाय योजना करण्‍याची मागणी होत आहे.
       ग्रामीण भागातील बराचसा समाज शेतीवर अवलंबून असल्‍याने  विमुक्‍त भटके व आदीवाशी हे बहुतांश यांचे कुटुंब उघडयावर पडले आहे. त्‍यामुळे त्‍याच्‍यावर उपासमारीची वेळी आलेली आहे. तरी  शासनाने उस्‍मानाबाद जिल्‍हयात सिमेंट बंधारे , नाला  बल्‍डींग, यासह इतर कामे सुरू करावे. कोरड वाहु व बागायत शेतक-यासाठी अर्थिक मदतीची व्‍यवस्‍था करावी, दुधाचे दर घसरल्‍यामुळे शेतकरी आंदोलन करत आहेत.  दुधाला योग्‍य दर द्यावा. सर्व महामंडळाची कर्ज माफी करावी. इत्‍यादी मागण्‍यासह शेतक-यांना   न्‍याय  देण्‍याची मागणी विमुक्‍त भटके आदिवासी महासंघाचे जिल्‍हाध्‍यक्ष बाबासाहेब आंधारे यांनी उस्‍मानाबाद जिल्‍हाधिका-याकडे लेखी केली आहे.  
 
Top