Thursday, 26 February 2015

दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व कुक्कुट पालन प्रशिक्षण

 उस्मानाबाद -  महाराष्ट्र राजय उदयोजकताविकास केंद्राच्यावतीने परंडा येथे 
सुशिक्षीत बेरोजगार युवक व युवतीसाठी दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व कुक्कुट  पालन प्रशिक्षण कार्यक्रम 5 मार्च ते 15 मार्च या 10 दिवसीय या कालावधीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणात संपूर्ण दुग्ध व्यवसायाचे महत्व, गायीच्या जाती, चा-यांचे नियोजन, लसीकरण, दुधाचे पॅकींग, दुधविक्री तसेच शेळी पालन, उस्मानाबाद शेळीचे महत्व, करडयाची निगा, आहार व आजाराविषयी माहिती ,अर्ध बंदिस्‍त व बंदीस्त शेडची, शेळ्यांच्या वेगवेगळया जातीची  माहिती व कुक्कुट पालनामध्ये गावरान व बॉयलची माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय खादयाची व शेडची माहिती, विमा आदि व उदयोजकीय अभ्यासक्रमाविषयी दररोज तज्ञ डॉ. व्यक्तीचे मार्गदर्शन व यशस्वी उदयोजकांचे मार्गदशन यावेळी  करण्यात येणार आहेत.
उदयोजकीय  संभाषण कौशल्य, व्यक्मत्व विकास, प्रकल्प अहवाल, बँकिग अधिका-यांचे मार्गदर्शन कर्ज प्रस्ताव ,अहील्यादेवी होळकर महामंडळ, नाबार्ड आदि विषयी माहिती  देण्यात येणार आहे. इच्छुक युवक- युवतींनी अधिक अर्जासाठी व माहितीसाठी  कार्यक्रम समन्वयक संजय वैदय, मो. नं. 9579362310 पंचायत समिती कार्यालय,परंडा येथे संपर्क साधावा, असे आवाहन कनिष्ठ  प्रकल्प अधिकारी पांडुरंग कांबळे एम. सी.ई. डी द्वारा जिल्हा उदयोग केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे.

Labels: