उस्‍मानाबाद -  जिल्ह्यात होवू घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत शिवसेनेच्या   पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी  स्वतःला जोमाने काम करण्‍याचे अवाहन शिवसेनेचे नुतन जिल्हा संपर्कप्रमुख गौरीष शानभाग यांनी केले.
          शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर गौरीष शानभाग यांनी आज उस्‍मानाबाद शहरास भेट दिली. यावेळी येथील मेघमल्हार सभागृहामध्ये जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी आमदार ज्ञानराज चौगुले, सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, महिला आघाडी जिल्हा संघटक शामल वडणे, शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक मुजीब पठाण, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख, युवा सेना जिल्हाधिकारी सुरज साळुंके, जि.प.चे माजी बांधकाम सभापती धनंजय सावंत आदिजण उपस्थित होते. 
  जिल्हा शिवसेनेच्या संपर्कमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल  जिल्हाप्रमुख सुधीर पाटील व आ. चौगुले यांच्यासह  पदाधिका-यांच्या हस्ते  शानभाग यांचा सत्कार करण्यात आला. 
 शानभाग बोलताना पुढे म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने तसेच गेली पंधरा वर्षे आहोरात्र कष्ट करणा-या शिवसैनिकांचे भले करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी यापुढील काळात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुक्यातील शिवसैनिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी जनता दरबार घेण्यात येईल. यामध्ये सामान्य शिवसैनिकांचे प्रश्न व त्यांच्या अडचणी समजावून घेवून त्यासाठी प्रयत्न केले जातील. यापुढील काळात पक्षाच्‍या पदाधिका-यांनी शिवसेना सभासद नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. छत्रपती शिवराय यांची जयंती शिवसेना नेहमीच तिथीप्रमाणे साजरी करते. येत्या ८ तारेख तिथीप्रमाणे येणारी शिवजयंती असून जिल्हा शिवसेनेच्या वतीने ती सर्व जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात  यावी, त्याच बरोबर शिवजयंतीच्या निमित्ताने प्रत्येक तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात यावे, असे आवाहनही त्यांनी केले. येत्या कांही दिवसात शासकीय समित्या कार्यन्वित केल्या जातील. त्यामध्ये निष्ठावंत व प्रामाणिक शिवसैनिकास निश्चित संधी दिली जाईल. असे सांगून पदाधिका-यांनी पक्षाच्या सदस्याची नोंदणी करताना आपणही सक्रिय सभासद आहोत काय ? याची शहानिशा केली पाहिजे. 
    शिवसेनेत व्यक्तीपेक्षा पदाला महत्व आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पदाचा सन्मान केला पाहिजे. संघटनात्मक कामात स्वतःला झोकून द्या व या जिल्ह्यात पक्षाचे काम वाढवा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. येत्या कांही दिवसात जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका आहेत. तेव्हा या निवडणूकीत सामान्य शिवसैनिकांना पाठबळ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिका-यांनी झोकून देवून काम केले पाहिजे असे सांगून पक्षाचे जे लोकप्रतिनिधी, संघटनात्मक कामात जर योगदान देत नसतील तर अशा लोकप्रतिनिधीचा विचार करावा लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 
  आगामी ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेच्या सर्व लोकप्रतिनिधीनी जोमाने  काम करण्‍याचे सांगून शिवसैनिकाचे पद हे सगळ्यात मोठे आहे. भविष्‍यात पदाधिका-या अडचणी सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. 
या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, दिलीप शाळू महाराज, अजित पिंगळे यांच्यासह तालुकाप्रमुख सर्वश्री दिलीप जावळे, राजअहमद पठाण, बाबुराव शहापुरे, मोहन पनुरे, रामलिंग आवाड, बाळासाहेब उंदरे, अनिल शेंडगे, प्रा. गौतम लटके, कळंब पंचायत समिती सभापती छाया वाघमारे, माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे,  नगरसेविका जयश्री उटगे, तुळजापूर शहरप्रमुख सुधीर कदम, माजी जि.प. सदस्य गणेश सोनटक्के, प्रकाश तावडे यांच्यासह शिवसेनेचे  पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top