पांगरी (गणेश गोडसे)  ग्रामीण डाक सेवकांनी गत दहा दिवसापासून आपल्या विविध मागण्यासाठी देशव्यापी संप पुकारला असल्यामुळे भारतीय पोस्ट खात्यातील सर्व दैंनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.या कर्मचार्‍यांच्या संपाचा अनेकांना फटका बसत असून संप मिटणे गरजेचे आहे.
     अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघाने ग्रामीण भागातील डाक सेवकांना पोस्ट खात्यात सामावून घ्यावे,पोस्ट कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, ग्रामीण डाक सेवकांना स्वास्थ विमा लागू करावा या मागण्यासाठी 10 मार्च पासून देशव्यापी बेमुदत बंद पुकारला आहे.बेमुदत संप सुरू होऊन दहा दिवसाचा कालावधी उलटून जावूनही याकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नसुन अजूनही संप सुरूच आहे.  गत दहा दिवसापासून बार्शी तालुक्यातील ग्रामीण पत्रव्यवहार व इतर यंत्रणा विस्कळीत झाली आहे.मणी ऑर्डर,रजिस्टर,नौकरी संदर्भातील ऑर्डरी,पार्सल,आर.डी,सेव्हिंग,शाळेचे पेपर,यासह पोस्टाने नव्याने सुरू केलेल्या सुकन्या योजना आदि विविध कामे खोळंबली आहेत. संबंधित प्रशासन दहा बराच कालावधी उलटून जावूनही याकडे गांभीर्याने पहाट नसल्यामुळे पोस्ट कर्मचार्‍यामधुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पोस्ट कर्मचार्‍यांनी रेल्वे रोको,रास्ता रोको,आदि आंदोलने करूनही प्र्शाषणाने याची दाखल घेतली नाही.देशातील साडेतीन लाख पोस्ट कर्मचारी सध्या या संपात सहभागी असल्याचे पोस्ट कर्मचार्‍यांनी सांगितले.
 चौकट: शाशन,प्रशाशन व पोस्ट कर्मचार्‍यांच्या भांडणात अनेकांना नवीन येऊ घातलेल्या नौकरीस मुकावे लागणार आहे.कारण त्या व्यक्तीस संपामुळे नौकरीची ऑर्डर अथवा इतर कोणतेच पत्र मिळू शकणार नाही.यास जबाबदार कोण?असा प्रश्न जनतेमधुन विचारला जात आहे.

 
Top