उस्मानाबाद - बुधवार, दि. 11 मार्च रोजी रंगपंचमी सण उत्सव साजरा होत असल्याने जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था कायम रहावी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दारु विक्रीची दुकाने बुधवार, दि. 11 मार्च रोजी बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानूसार सर्व देशी-विदेशी/एफ एल/बीअर-2/परवाना कक्ष/ ताडी  विक्रीचे केंद्र वरील दिवशी  बंद राहतील.      
 
Top