उस्मानाबाद -: एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रा.प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका/मिनी अंगणवाडी सेविका/मदतणीस या पदासाठी  भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून सदर भरतीत प्रक्रियेत खाली नमूद करण्यात आलेल्या गावांमध्ये गावासमोरील नमूद करण्यात आलेल्या पदांसाठी आवेदनपत्र दि. 15 एप्रिल ते 24 एप्रिल,2015 याकालावधीत अर्ज प्रकल्प कार्यालयात कार्यालयीन वेळेत (शासकीय सुटी दिवस वगळून) स्वीकारले जाणार आहेत, याची संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
        एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मुरुम ता. उमरगाअंतर्गत वरनाळवाडी (01) अंगणवाडी सेविका, कंटेकूर व नाईकनगर (सु.) या गावांची प्रत्येक एक मदतणीस  अशी दोन्ही मिळून 03 पदांची भरती.
      तुळजापूर तालुक्यातील  तीर्थ बु. (01) अंगणवाडी सेविका, मंगरुळ, कांक्रबा, मांळूबा, काटी या गावातील प्रत्येकी एक अशी (04) मदतणीसांची पदे.
       कळंब तालुक्यातील भोगजी येथील (01) मिनी अंगणवाडी सेविका तर लोहटा पू. (02), शिराढोण (01),खामसवाडी (01), पानगाव(01), पाडोळी (ना) (01) आणि  हिंगणगाव (01) अशी एकूण (01) मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस (07) पदांची भरती होणार असून संबंधित ठिकाणी अर्ज वाटप व स्वीकृती दिनांक दि. 15 ते 24 एप्रिल,2015 (सुटीचे दिवस वगळून) असा भरतीचा कार्यक्रम आहे. या पदांसाठी जास्तीत जास्त महिला उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन संबंधित एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प यांनी आवाहन केले आहे. 
संबंधित गावातील पात्र महिलांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत असून अधिक माहिती व आवश्यक सूचना व कागदपत्रासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही  आवाहनही त्यांनी एका पत्रकान्वये केले आहे.  
 
Top