शिवसेनेच्या विजयाचा उस्मानाबादमध्ये जल्लोष - Tuljapurlive.com

Tuljapurlive.com

तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, 15 April 2015

शिवसेनेच्या विजयाचा उस्मानाबादमध्ये जल्लोष

उस्मानाबाद - कॉंग्रेस नेते नारायण राणे व एमआयएमच्या उमेदवाराचा पराभव करीत मुंबईतील वांद्रे विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भरघोस मताधिक्यांनी विजय संपादीत केला. या विजयाचा उस्मानाबादमधील शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. शहरातील छत्रपती शिवाजी चौकातील शिवछत्रपतींच्या अश्‍वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जल्लोष करण्यात आला. शिवाजी चौकात शिवसेनेच्या उमेदवाराच्या विजयाबद्दल ङ्गटाके ङ्गोडून तसेच रस्त्याने ये-जा करणार्‍या नागरिकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, युवा सेनेचे तुळजापूर तालुकाप्रमुख कमलाकर दाणे, प्रदीप साळुंके, राजाभाऊ घोडके, नगरसेवक सोमनाथ गुरव, रवी वाघमारे, तुषार निंबाळकर, वाहतूक सेनेचे राजाभाऊ पवार, प्रवीण शिंदे, विनोद निंबाळकर, बापू साळुंके, सुमित बागल आदी उपस्थित होते. 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages