नळदुर्ग महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. मधु मनिषसिंह हजारी विज्ञान प्रज्ञा शोध परिक्षेत राज्यात प्रथम

नळदुर्ग,दि. ०२:डॉ. दिपक जगदाळे 

 येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु मधू मनिषसिंह हजारी हिने बलभिम महाविदयालय बीड येथे आयोजीत १४ व्या विज्ञान  प्रज्ञा शोध  परिक्षेत १०० पैकी ९२ गूण घेऊ प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

बीड येथील बलभीम महाविद्यालयाच्या वतीने  राज्यस्तरीय विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

 दि. २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या विभागांतील २८ 
महाविद्यालयाने सहभाग नोंदविलेला होता.
दि. २८फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान   डॉ ए पी जे अब्दुल कलाम लिखित अग्रिपंख पुस्तकाच्या लेखिका  माधुरी शानबाग (बेळगाव) यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
 नळदुर्ग महाविद्यालयांमधून एकूण 71 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती त्यापैकी ५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी एकूण १८ विद्यार्थी प्रमाणपत्रासाठी पात्र ठरले असून कु मधु हजारी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेसाठी  वनस्पतीशास्त्राचे विभाग प्रमुख प्रा डॉ उद्धव भाले यांनी समन्वयक म्हणून मोलाचे मार्गदर्शन करून संबंधित अभ्यास स्रोत उपलब्ध करून दिला त्यामुळेच हे यश महाविद्यालयाच्या पदरात पडले आहे. ही परीक्षा केवळ स्पर्धा नसून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक क्षमतेला चालना देणारा आणि भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयार करणारा एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम आहे. डॉ. उद्धव भाले हे नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबाबतची जनजागृती करून त्यांना प्रेरणा  देत असल्यामुळेच सदरिल विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.

 या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण सचिव उल्हास बोरगांवकर, कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे ,बाबुराव चव्हाण,यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड, उपप्राचार्य डॉ. अशोक कदम,वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ उद्धव भाले,नॅक समन्वयक डॉ शिवाजी घोडके कार्यालय अधिक्षक धनंजय पाटील  सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top