एक तास आपल्या गावांसाठी या उपक्रमाचा लोहगाव येथे शुभारंभ

नळदुर्ग,दि.२६:

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे एक तास आपल्या गावांसाठी या उपक्रमाचे आज सुरुवात करण्यात आली. या उपक्रमामध्ये गावातील स्वच्छ व विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

आठवड्यातील दर रविवारी एक तास गावांसाठी या उपक्रमात गावातील युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.  त्यामध्ये माजी सैनिक आप्पाराव होळे, प्रेमनाथ मारेकर, विरभद्र मेंडके, अतुल पाटील, सुरेश चव्हाण, प्रभाकर कलशेट्टी, इराप्पा मिरगे, अक्षय पाटील, नेताजी दबडे, सोमनाथ पांचाळ, आप्पाश कलशेट्टी, अमोल कुंभार, विश्वास माने, नागनाथ दबडे  या युवकाने सहभाग घेऊन आज गावातील विठ्ठल मंदिर, भिमनगर येथील सभागृह व ग्रामपंचायत कार्यालय समोरील चौकात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आता प्रत्येक रविवारी हा उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top