सजीवनी समाधी शतकोत्तर सोहळ्यानिमित्त अतनुर येथे भक्तीचा महापुर
अतनुर/मुरुम,दि.२३ : डॉ सुधीर पंचगल्ले
जळकोट तालुक्यातील अतनूर येथील श्री.सदगुरू घाळेप्पा स्वामी महाराज यांच्यासजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी १५० व्या. सजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त श्री.काशी विश्वनाथ महादेव मंदिर संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व शिवपुराण महाकथेला
अतनूर येथे महाशिवपुराण कथाकार व किर्तनकारांसह हा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला असून परिसरात आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे.
दैनंदिन भरगच्च कार्यक्रम या सप्ताहामध्ये दररोज पहाटे ६ ते ७ श्री. घाळेप्पा स्वामी महाराजांचा रुद्राभिषेक, ७ ते १० श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा वरील भजन, २ ते ५ महापुराण कथा, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, ९ ते ११ हरिकिर्तन, रात्री १२ ते ४ हरिजागर, पहाटे ४ ते ६ काकडा आरती, दररोज अशा वेळेनुसार कार्यक्रम होत आहेत . महाराष्ट्रातील नामावंत कीर्तनकाराची कीर्तन रंगतदार होणार आहेत. हरीजागर कीर्तन महोत्सवाला प्रमुख वक्ते सप्ताहात दररोज विविध मान्यवर कीर्तनकाराची सेवा लाभणार आहे. दुपारी दोन ते पाच या वेळेत दिव्य महाप्रसादाचे भाविकांसाठी आयोजन करण्यात आले आहे.
श्री सदगुरू श्री घाळेपा स्वामी महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी 150 व्या संजीवनी समाधी सोहळा निमित्त महाशिवपुराण कथा व, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह निमित्य भव्य महाप्रसाद
श्री तानाजीराव सोमुसे व श्री मनोहरराव मुगदळे यांच्या आयोजित महाप्रसादाच्या सुंदर जेवनाबद्दल.... आजच्या या पवित्र हरिनाम सप्ताह मध्ये अन्नाचा गोडवा आणि श्रद्धेचा ओलावा दोन्ही पाहायला मिळाले विशेषतः चुलीवरच्या भाकरीचा व भोकरीवरणाचा गावरान स्वाद गरमागरम वरण भात , कांदा काकडी, लिंबू यामुळे या महाप्रसादाची लज्जत अधिकच वाढली अन्नदात्यांनी अतिशय प्रेमाने आणि श्रद्धेने हे भोजन वाढले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार हे अन्न ग्रहण करून आमचे शरीर आणि मन दोन्ही तृप्त झाले आहेत धन्यवाद.... विठ्ठलाच्या नामाचा गजर आणि त्यात जोडीला चुलीवरच्या भाकरी व भोकरी वरणाचा तो अस्सल सुवास आजच्या पंगतीत वरण-भात आणि भोकरीचा बेत होता त्याने साक्षात पंढरपूरच्या महाप्रसादाची आठवण करून दिली जेवण केवळ पोट भरण्यासाठी नव्हतं तर त्यात गावातील माणसाच्या माणुसकीचा आणि भक्तिचा स्वाद होता इतका सुंदर महाप्रसाद तयार करणाऱ्या सर्व स्वयंपाकी बांधवांचे यजमान अन्नदात्याचे व मंदिर कमिटीचे आयोजकाची व समस्त गावकऱ्यांचे आम्ही खरोखरच ऋणी आहोत.अन्न हे पूर्ण ब्रम्ह यांचा प्रत्यय आज आम्हाला आला आहे धन्यवाद व आभार.मच्या प्रारब्धात हा अतनुर मधील सुवर्ण क्षण पहायला मिळाला.
या सोहळ्याला पंचकोशीतील व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आव्हान श्री.महादेव मंदीर मंदिराचे तसेच काशी विश्वनाथ संस्थान मंडळाचे पदाधिकारी व भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळी अतनूर यांच्या वतीने करण्यात आले.