पणजी :- गोवा इथे 20 नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या  ४६ व्या  आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज सोमवार दि. ३० नोव्‍हेंबर रोजी समारोप झाला. भारतीय चित्रपटसृष्टीच्या समृध्द प्रवासाला संगीतमय मानवंदना देत आणि आर्जेन्टिनाच्या ‘एल क्लान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे.  

दहा दिवस चाललेल्या या चित्रपट महोत्सवातील काही महत्वाचे मुद्दे :
·         युनेस्कोच्या फिलीनी मेडल या पुरस्काराचे इफ्फी महोत्सवात पहिल्यांदाच वितरण होणार आहे.
·         इफ्फी २०१५ मध्ये स्पेन या देशावर भर दिला गेला होता. 
·         महोत्सवात एकूण ७००० प्रतिनिधी सहभागी झाले .
·         महोत्सवासाठी आंतरराष्ट्रीय जुरी समितीचे अध्यक्ष शेखर कपूर होते,त्याशिवाय, इग्लंडचे दिग्दर्शक मिखाईल रेडफोर्ड, पेलेस्टाईनच्या दिग्दर्शिका सुहा अराफ, जर्मन अभिनेत्री जुलिया जेन्स्त आणि दक्षिण कोरियाचे चित्रपट निर्माते जेओन क्यू हवान यांनी सदस्य म्हणून काम पाहिले.
·         १३ सदस्यांच्या फिचर फिल्म जुरीचे अध्यक्ष अरीबाम श्याम शर्मा होते, तर नॉन फिचर फिल्म साठी ७ सदस्यीय जुरीचे अध्यक्ष राजेंद्र जंगले होते.
·         या चित्रपटात एकूण १२० चित्रपटांचे प्रीमियर खेळ झाले , ज्यात जागतिक, आशियाई आणि भारतीय चित्रपटांचा समावेश होता.
·         यावर्षी महोत्सावत एकूण ८२० चित्रपट प्रतिनिधी सहभागी झाले, ज्यात ५४० भारतीय आणि २८० आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी होते. यात दिग्दर्शक, कलाकार ,निर्माते, तंत्रज्ञ, ऑस्कर अकादमी सदस्य आणि हॉलीवूडचे तज्ञ यांचा समावेश होता.
·         या महोत्सवात यंदा एकूण ७९० चित्रपट प्रवेशासाठी अर्ज आले होते.
·         यापैकी १८२ चित्रपटांची अंतिम निवड झाली .
·         एकूण ९० देशांनी या महोत्सवात सहभाग घेतला.
·         महोत्सवाचा आरंभ ‘द मन हू न्यू इन्फीनीटी’ या चित्रपटाने , तर मध्य- ‘ड दानिश गर्ल’ या चित्रपटाने झाला. या दोन्ही चित्रपटांचे समीक्षक आणि रसिक प्रेक्षकांनी कौतुक केले.
·         महोत्सवाचा अखेरचा चित्रपट ‘एल क्लान’ हा ७२ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मुख्य स्पर्धा विभागासाठी निवडल्या गेला होता, या महोत्सवात दिग्दर्शक आबेलो त्रापेरो यांनी रौप्यसिंह पुरस्कार जिंकला. ८८ व्या अकादमी पुरस्कार स्पर्धेतही ‘एल क्लान’ परदेशी भाषा विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवडला गेला. 
·         ऑस्कर पुरस्कारासाठी अधिकृत प्रवेश म्हणून पाठवले गेलेले २६ चित्रपट , यासह कान्‍स, बर्लिन, तोरोन्तो आणि लोकार्नो चित्रपट महोत्सवातील चित्रपट इफ्फीमध्ये दाखवण्यात आले.
·         भारतीय पानोरामा विभागात एकून ४७ चित्रपट होते, ज्यात फिचर आणि नॉन फिचर चित्रपटांचा समावेश आहे.
·         न्यू होरायझन फ्रोम नॉर्थ इस्ट या विशेष विभागात इशान्येकडील ज्येष्ठ चित्रपट निर्माते अरीबाम श्याम शर्मा यांच्या चित्रपटांचा प्रवास आणि ईशान्य भारतातील नव्या पिढीच्या , युवा दिग्ददर्शकांचे चित्रपट दाखवले गेले.
·         यावर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत एकून १५ चित्रपट होते , त्यापैकी ५ चित्रपट विविध विभागात ऑस्कर पुरस्कारासाठी अधिकृत प्रवेश म्हणून पाठवले गेले आहेत. यात कोलंबियाचा “ अल अब्राझो दे ला सेर्प्न्ते’ ( सापाची मिठी) हा सिरो गुएरा यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट, फ्रान्‍सचा, देनिझ गाम्झे इर्गुवेन दिग्दर्शित ‘मस तंग’, जर्मनीचा , ‘इम लेबिरीन्थ देस श्विगंस’ हा ग्युलीयो रीसियारेली यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट, आईसलंडचा चित्रपट ‘राम्स’ हा ग्रीमुर हाकोनार्सन यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट , सर्बियाच्या गोरान राडोवेनोवीच यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट  ‘एन्क्लेव’ यांचा समावेश होता.
·         ऑस्करविजेते रशियन चित्रपट निर्माते, अभिनेते आणि रशियाच्या सिनेमटोग्राफर संघटनेचे प्रमुख निकिता मिखाल्कोव यांना या महोत्सवात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. जागतिक चित्रपटाला त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेत , त्याचा गौरव केला जाणार आहे. त्यांचे काही खास चित्रपट ‘बर्न्त बाय द सन’ , संन्स्त्रोक, बार्बर ऑफ सायबेरिया अॅण्‍ड ओब्लोमोब’ यांचे प्रदर्शनही या महोत्सवात करण्यात आले.
·         महोत्सवाच्या प्रारंभी, शतकातील चित्रपट व्यक्ती म्हणून संगीतकार इलिया राजा यांचा गौरव करण्यात आला.
·         या महोत्सवात आय सी एफ टी - युनेस्को ने एक चर्चासत्र आयोजित केले होते, विषय होता - 'चित्रपट आणि सांस्कृतिक विविधता' यात फ्रान्सचे फिलिप कुएयु , कॅनडाचे चार्ल्स वेलरंड आणि भारताच्या शारदा रामनाथन यांनी सहभाग घेतला होता .
·         फिक्कीच्या समन्वयाने अमेरिकेमध्ये चित्रीकरण करण्याविषयी उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींची बैठक झाली.
·         राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाची माहिती सांगणारे बहुमाध्यम प्रदर्शनही या महोत्सवात आयोजित करण्यात आले होते .भारत सरकारचा प्रसिद्धी विभाग आणि राष्ट्रीय फिल्म्स डिव्हिजनने हे प्रदर्शन भरवले होते.
·         ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या चित्रपट करकीर्दीवर प्रकाशझोत टाकणाऱा विशेष विभाग या महोत्सवात होता. त्या अंतर्गत, त्यांच्या अभिनय आणि चित्रपट निर्मिती कौशल्याची झलक दाखवली गेली. तसेच , शशी कपूर यांचे 8 चित्रपटही महोत्सवात दाखवले गेले. यात जूनून (1978) ,न्यू दिल्ली टाइम्स (1986) ,उत्सव (1984), इन कस्टडी (मूहाफीज), कलयुग (1981),दीवार (1975) शेक्सपियरवाला आणि हाऊस होल्डर या चित्रपटांचा समावेश आहे.
·         ऑस्कर अकादमीच्या तीन सदस्यीय शिष्टमंडळाने यावेळी पहिल्यांदाच भारताला भेट दिली. या शिष्टमंडळाने प्रतिनिधींना चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान शिकवले . यात साऊंड डिझायनिंग , फिल्म आरकाईव्ह , एडिटिंग आणि कास्टिंग, यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
·         आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या अशा चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली. यात अनिल कपूर,ईलिया राजा , सोनाक्षी सिन्हा , कबीर खान , देव पटेल, आयुष्यमान खुराणा,  मार्क मांगिनी , आदिती राव हैदरी, जॅकी श्रॉफ , नाना पाटेकर , सचिन पिळगावकर , सुभाष घई, शेखर कापूर, कौशिक गांगुली, एडवर्ड प्रेसमान, निकिता मिखालकोव्ह , राजकुमार हिरानी, प्रियदर्शन, मधुर भांडारकर , आनंद राय, श्याम बेनेगल, के के सेनथील कुमार आणि  शंकर महादेवन यांची उपस्थिती होती.
·         राष्ट्रीय चित्रपट वारसासंग्रह अभियानाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी ' जतन केलेले चित्रपट' असा एक विशेष विभाग ठेवण्यात आला होता. भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रह (NFAI) विभागाने भारतीय माहिती प्रसारण विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग केला होता.भारताचा वैविध्यपूर्ण चित्रपट वारसा आणि परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरेल.
·         जागतिक चित्रपट निर्मात्यांच्या प्रतिभेचा गौरव करण्यासाठी या महोत्सवात फर्स्ट कट हा विशेष विभाग होता .यात अमेरिकेचे चित्रपट निर्माते, ब्रियान पेकिंग्ज यांचा गोल्डन किंगडम, जर्मनीच्या मिखाईल क्लेट्टे यांचा सोलनेस, पोलंडच्या पीओतर चारझन यांचा मोसकविच - माय लव्ह, यांच्यासह इतर चित्रपट दाखवण्यात आले.
·         महिला दिग्दर्शक आणि निर्मात्यांना प्रोत्साहन देणारा विशेष विभाग ' वुमन क्लाचर ऑफ सिनेमा ' या महोत्सवात होता. यात भारतीय महिला दिग्दर्शिकांचे चित्रपट दाखवले गेले . यात अंजली मेनन यांचा मंजादिकुरु , अपर्णा सेनेचा 36 चौरंगी लेन, झोया अख्तरचा जिंदगी ना मिलेगी दोबारा , हे चित्रपट दाखवण्यात आले.
·         प्रसारमाध्यमांसाठी काही विशेष उपक्रमही या महोत्सवात होते. यात पत्रकार परिषदांचे इंटरनेटवर थेट प्रक्षेपण, महोत्सवाचा मोबाईल अँप, आणि चित्रपट , प्रतिनिधी, मान्यवर यांच्या त्वरित माहितीसाठी इतर सेवा देण्यात आल्या.
·         एकाचवेळी अनेक चित्रपटांचे खेळ सुरु असूनही प्रत्येक प्रदर्शनाला प्रेक्षकांची गर्दी होती.
·         राजकुमार हिरानी, मधुर भांडारकर, श्याम बेनेगल, वेत्तीमारन, कौशिक गांगुली, राकेश ओमप्रकाश मेहरा, प्रियदर्शन, आनंद राय, यांनी ' इन कनव्हरसेशन' या विशेष सत्रात सहभाग नोंदवला .या सत्रात रसिक प्रेक्षकांना आपले आवडते चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
·         'सध्याचा अर्जेंटिनियन चित्रपट ' हे विशेष पॅकेज या महोत्सवात होते. यात अर्जेंटिना झोन्दा, एल सिंको, इंटिमेट विटनेस, मेक्सिकन ऑपेरेशन , रपचर, आणि वाईल्ड टेल्स हे चित्रपट दाखवण्यात आले.
·         महोत्सावात झालेले खुले चर्चासत्र आणि पत्रकार परिषदेत प्रेक्षक आणि प्रसारमाध्यमांनी सहभाग घेतला.
·         महोत्सावाच्या समारोपाला अर्जेंटिना, नायजेरिया, आणि तुर्कस्तानचे मान्यवर येणार आहेत. उद्‌घाटन समारंभाला स्पेन आणि इस्रायलचे मान्यवर आले होते.
·         आंतरराष्ट्रीय आणि भारतीय चित्रपट दिग्गजांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांना थेट संवाद साधता आला.
·         विविध विषयांवरील चित्रपटांच्या निवडीची परदेशी आणि भारतीय पाहुण्यांनी प्रशंसा केली.
·         जागतिक स्तरावरील सर्वोत्तम चित्रपटांचे शो भारतीय रसिकांना तर आतंरराष्टीय प्रेक्षकांना भारतीय चित्रपटांचे शो दाखवण्यात आले.
·         या संध्याकाळच्या विशेष कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संगीतकार ए आर रेहमान होते. नामवंत चित्रपट निर्माते पाबेलो सिझार, जोहन बेलस, गुनित मोंगा, मायकेल वार्ड यांच्यासारख्या दिग्गजांनी या महोत्सवात हजेरी लावली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते, भागीरथी , तपन बिस्वास, श्रीजित मुखर्जी, कौशिक गांगुली यांच्यासह अनेक मान्यवरांनी रसिक प्रेक्षक आणि माध्यमांशी संवाद साधला.
·         जागतिक चित्रपट सृष्टीतील अद्वितीय आणि खास चित्रपटांचे या महोत्सवात प्रदर्शन करून इफ्फीने उत्तम दर्जाचे नवे मापदंड तयार केले आहेत. यात २६ ऑस्कर नामांकित चित्रपटांचाही समावेश होता. त्याशिवाय कान्स, बर्लिन, व्हेनिस आणि बुसान चित्रपट महोत्सवात प्रदाशित झालेले चित्रपटही यावेळी दाखवण्यात आले.
----------

 
Top