परंडा :- सोनारी (ता. परंडा) येथील श्री काळभैरवनाथाच्या जन्मोत्सवानिमीत्त दि. ३ व ४ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्तिक वद्य अष्टमी रोजी म्‍हणजे गुरुवार दि. ३ डिसेंबर रोजी रात्री ९ ते १२ या वेळेत नारदीय किर्तन, १२ वाजता जन्मोत्सवाचा मुख्य कार्यक्रम (गुलाल उधळणे), श्रींचा पाळणा, आरती व पंचखाद्य प्रसाद वाटप हे कार्यक्रम होणार आहेत. दि. ४ डिसेंबर रोजी काळभैरवनाथास मुख्य पुजारी चंद्रकांत पुजारी यांच्या हस्ते लघुरुद्राभिषेक करुन दुपारी बारा वाजता महानैवद्य दाखवून आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तर शनिवारी सेवेकर्‍यांना बिदागी वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top