नळदुर्ग :- येथील नगरपालिकेने वडिलोपर्जित कब्जे वहिवटीनुसार राहणा-या लमाण तांडायातील पक्की घरे उध्दवस्त करुन बेघर कलेल्या कुटूंबियांना राष्ट्र सेवा दल संचलित आपलं घर प्रकल्पाच्यावतीने मदतीचा हात देवून ब्लँकेट (चादर) वाटप करण्यात आले. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यानी पुढाकार घेवुन ही मदत ५० कुटूंबियाना करण्यात आली . 

कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी राष्ट्र सेवा दलाचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम जेठे यांनी सांगितले की, शहरामध्ये अकरा महिन्याच्या करारावर घर भाडयाने दिले जाते. मुदत संपल्यानंतर ते घर सोडताना त्यांच्या मनाला वेदना होतात. नळदुर्ग येथील हक्काची घरे प्रशासनाने उध्दवस्त केल्यामुळे अनेकांना बेघर व्हावे लागले. या घटनेचा विशेषत: गृहिणी माता भगिनींना मोठा धक्का बसला असून त्यानी घराला घरपण देण्यासाठी त्यांचे मोठे कष्ट आहेत. घरातील भिंती सारवणे, घर निटनेटके करुन स्वच्छता राखण्यासाठी सतत धडपड करतात. असे दिवसभरातून अनेकवेळा घरामध्ये हात फिरविणा-या माता भगिनी उघडयावर, रस्त्यावर आल्यामुळे त्यांच्या दु:खाची जाण आपल्याला असल्याची सांगताच महिलांनी डोळयाला पदर लावले. यावेळी परसराम राठोड, श्वेता नाईक, उज्वला चव्हाण, श्रीमती सिताबाई राठोड, अनिता कांबळे, श्रीमती सुनिता बनसोडे, यांच्यासह पन्नास कुटुंबियाना ब्लँकेट मुंबईचे उद्योगपती सुधीर देसाई यांनी दिलेले वाटप करण्यात आले. 

राष्ट्र सेवा दलाचे संतोष बुरंगे, रिपाइंचे तुळजापूर तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड, नळदुर्ग शहराध्यक्ष बाबासाहेब बनसोडे आदीनी आपले विचार व्यक्त केले. 

प्रास्ताविक व आभार शिवाजी नाईक यांनी मानले. या कार्यक्रमास पत्रकार दादासाहेब बनसोडे, बळीराम चौधरी, अजय कदम, संगप्पा नागशेटे, विश्वनाथ कानडे, पांडुरंग पाटील, राजाराम नाईक, अशोक बंजारे, परसराम राठोड, सुधाकर नाईक, मकबुल जमादार, फुलचंद जाधव, सौ. शांताबाई बंजारे, श्रीमती सुनिता बनसोडे, अनिता कांबळे, श्रीमती शांताबाई जनार्धन जाधव, लिंबाजी गायकवाड आदीजण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशिष लोंढे, अरुण नाईक, सुनिल जाधव, दिपक कांबळे, सचिन राठोड, प्रविण पवार आदीनी परिश्रम घेतले.
 
Top