Wednesday, 29 July 2020

उमरगा : अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक जप्त


उमरगा, दि. 29 : 

स्था.गु.शा. चे पोउपनि- श्री पांडुरंग माने यांच्यासह पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- अविनाश मारलापल्ले यांचे पथक दि. 29.07.2020 रोजी पो.ठा. उमरगा हद्दीत रात्र गस्त करत होते. दरम्यान चालक- महेबुब मेहताब नदाफ व त्याचा सहायक- सय्यद जावेद शेख दोघे, रा. मुरुम, ता. उमरगा हे दोघे ट्रक क्र. के.ए. 56 -3041 ने सुमारे 5 ब्रास वाळु (गौण खनिज) विनापरवाना वाहुन नेत असतांना पथकास आढळले. यावरुन पथकाने तो ट्रक जप्त करुन उमरगा पो.ठा. च्या ताब्यात दिला आहे. उर्वरीत कारवाई ही महसूल प्रशासनाशी संपर्क साधून केली जाणार आहे. 

Labels: