शहापूर जिल्हा परिषद गटातील गावात प्रधानमंत्री ई मुद्रा कर्जबाबत भाजप कारर्यकर्त्यानी दिली माहिती
नळदुर्ग , दि . २६ :
तुळजापूर तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद गटात प्रधानमंत्री ई मुद्रा लोन संदर्भांत भाजपचे सुशांत भूमकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली
गावा - गावात बैठक घेवुन माहिती देण्यात आली.
शहापूर गटातील नवीन उद्योजकाना गावो गावी जाऊन ई मुद्रा लोन संदर्भात बैठक घेऊन या योजने बद्दल सविस्तर माहिती देऊन प्रत्येक गावात एका कार्यकर्त्यास हि जबाबदारी देण्यात आली व पुढील आठवड्यात या योजनेची सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले.
कर्जासाठी आवश्यक कागदपत्र पुढील प्रमाणे आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत खाते , मोबाईल नंबर लिंक (सहा महिन्यापूर्वीचे) आधार कार्ड लिंक आवश्यक , पॅनकार्डसह मोबाईल लिंक आदीसह इतर सर्व कागदपत्र व्यवस्थित असतील तर त्वरित आपले कर्ज आपल्या खात्यात जमा होईल. तरी ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यानी वरील कागदपत्रांची पूर्तता करून खालील प्रमुख कार्यकर्त्यांना भेटावे व गरजुनी ई मुद्रा लोन घेण्याचे आवाहन करुन काही अडचण असल्यास
सचिन घोडके यांच्याशी संपर्क करावे, त्याचबरोबर प्रमुख कार्यकर्ता
शहापूर गणेश नवाडे ,निलेगाव
संजय जमादार , विठ्ठल घंटे , निलेगाव तांडा- दगडू दुधभाते , अकबर शेखदार , देवसिंगा (नळ)- धनराज पाटिल , केशेगाव - प्रदिप हुकिरे ,
शिवानंद बिराजदार , सराटी - जठाशंकर पाटिल, सिद्राम सोलापूरे, बाभळगाव - मेघराज जाधव आदी.
Labels: Naldurg

<< Home