Sunday, 24 September 2023

दि पिपल मल्टीस्टेट बॅंकेमधील गणरायाची प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके व जितेंद्र गुंड यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती


दि पिपल मल्टीस्टेट बॅंकेमधील गणरायाची प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके व जितेंद्र गुंड  यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती 
  
काटी,दि.२४:

 दि.पिपल मल्टीस्टेट  बॅंकेच्या तुळजापूर तालुक्यातील काटी शाखेमध्ये प्रतिष्ठाना करण्यात आलेल्या गणरायाची शनिवार  दि.23 रोजी सकाळची  पुजा प्रगतशील शेतकरी जितेंद्र गुंड तर सायंकाळी प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके यांच्या हस्ते विधिवत पूजा करुन गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी "गणपती बाप्पा मोरया" च्या  घोषणा देण्यात आल्या.


यावेळी माजी चेअरमन  सयाजीराव देशमुख, सरपंच  परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर,प्रगतशील शेतकरी प्रकाश गाटे, वसंत  हेडे, जयाजी देशमुख ,दिपक हांडे, उमेश लवटे, रोहित गायकवाड,अजित रोडे,बॅंक कर्मचारी गणेश गाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Labels: