पक्षाने पुनर्विचार करून पुन्हा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना उमेदवारी देण्याची समर्थकांची मागणी
अणदूर,दि.२८
महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना तुळजापूर विधानसभेची उमेदवारी न दिल्याने चव्हाण यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे सोमवार दि.२८ ऑक्टोंबर रोजी तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथे पहावयास मिळाले.यावेळी अनेक नागरिकांच्या भावना अनावर झाल्या होत्या.
पक्षाने पुनर्विचार करून पुन्हा चव्हाण यांनाच उमेदवारी द्यावी, नाहीतर मधुकरराव चव्हाण यांनी आता सयंमाने न घेता आपला अपक्ष फॉर्म भरावा जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास व्यक्त करीत अणदूर व परिसरातील शेकडो समर्थकांनी चव्हाण यांच्या घरी जाऊन विनंती वजा मागणी केली.
तुळजापूर विधानसभा मतदार संघात काँग्रेसने ॲड धिरज पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अणदूर व परिसरातील जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. त्याचाच एक भाग म्हणून शेकडो नागरिकांनी सोमवारी सकाळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अणदुर ता.तुळजापूर येथिल निवासस्थानी त्यांची भेट घेऊन आता माघार घ्यायची नाही, असा निर्धार व्यक्त केला. या वेळी चव्हाण यांनी योग्य निर्णय घेऊ आपण शांत रहावे असे सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी ॲड. विशाल शेटे, माजी सरपंच धनराज मुळे, शरणप्पा कबाडे, अणदूरचे उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार, ग्रामपंचायत सदस्य डॉ विवेक बिराजदार यांची भाषणे झाली.
भाषणात काँग्रेस पक्षाने घोषित केलेली उमेदवारी बदलून मधुकरराव चव्हाण यांना घोषित करावी, नाहीतर ही निवडणूक अपक्ष लढवावी. संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, तसेच उद्या हजारोंच्या संख्येने नागरिक बंधू भगिनींनी तुळजापुरात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा करण्यात आली.
याप्रसंगी आप्पू धमुरे, संतोष दादा मुळे, संगप्पा हगलगुंडे, बाबुराव मुळे, कारबसपा धमुरे, मधुकर बंदपट्टे, खंडू मुळे, सुधीर ठाकूर आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Labels: Naldurg

<< Home