* नवा शब्‍द कोश
विवाह  -  असमांतर रेषेने केलेला कोन
मृत्‍यू   -  चांदण्‍यातील पहिली रात्र
जीवन  -   रेल्‍वेगाडीचा एक प्रवास
प्रेम      -   करमणुकीचे एक साधन
पतीपत्‍नी - ट्रक व गाडी याची टक्‍कर
पदवी     -  जास्‍त हुंडा मिळविण्‍याचे एक साधन
संप      -  टाईमपासाचे आधुनिक साधन
दारू     -  लवकर मोक्ष मिळविण्‍याचे औषध
अपघात  -  लोकसंख्‍या कमी करण्‍याचे साधन
* मग असे करा
चालावे वाटत असेल तर सन्‍मार्गाने चाला
पळावे वाटत असेल तर दुर्जनापासून पळा
धरावे वाटत असेल तर चांगली संगत धरा
टाकावे वाटत असेल तर आळस टाका
बोलावे वाटत असेल तर खरे तेच बोला
गिळावे वाटत असेल तर राग गिळा
गावे वाटत असेल तर प्रभुगुण गा
भांडावे वाटत असेल तर सत्‍यासाठी भांडा
मरावे वाटत असेल तर देशासाठी मरा .....
* भैरवनाथ कानडे, चिकुंद्रा
 
Top